कोपरगाव येथे तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धा संपन्न

  कोपरगाव प्रतिनिधी नाशिक  येथे होणाऱ्या ३१ व्या वरिष्ठ गट राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धासाठी रविवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीमा...

 कोपरगाव प्रतिनिधी

नाशिक  येथे होणाऱ्या ३१ व्या वरिष्ठ गट राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धासाठी रविवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय कोपरगाव येथे अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोशिएशनच्यावतीने वरिष्ठ गट   निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली. 

यामध्ये कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, के.बी. रोहमारे जुनियर कॉलेज, संजीवनी अभियांत्रिकी विद्यालय, एस एस जी एम कॉलेज कोपरगाव, आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर, रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहमदनगर येथिल २२ ते २५ खेळाडूं सहभागी झाले होते.तर यामध्ये १० मुली उपस्थित होत्या. 

 या निवड चाचणी स्पर्धाचे उदघाटन अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असो.चे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त  श्री. दिलीप  घोडके यांच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.

 अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असो.चे सचिव संदेश भागवत,सुनील गोडळकर ,शिवप्रसाद घोडके ,प्राध्यापक आकाश लकारे,दिलीप तुपसैंदर, निलेश बडजाते,अनिल काले आदी क्रीडा प्रशिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत