कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदी च्या दक्षिणेला वसलेल्या गुरु शुक्राचार्य यांची पावन भूमी असलेल्या जगातील एकमेव त...
कोपरगाव(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदी च्या दक्षिणेला वसलेल्या गुरु शुक्राचार्य यांची पावन भूमी असलेल्या जगातील एकमेव तीर्थस्थान शुक्राचार्य बेट भागाला कोपरगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्यास परम सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराज पालखी मार्ग असे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेल्या कित्येक दिवसा पासून स्थानिक नागरिक आणि भक्तांकडून होत आहे परंतु अद्यापही ही मागणी पूर्ण झालेली नसुन त्वरीत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी श्री कोपरगाव बेट देवस्थान ने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्यधिकारी, नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे.
दक्षिण तीरावरील कुंभमेळ्या चा उत्सवाप्रसंगी बांधलेल्या शुक्राचार्य व कचेश्वर देवयानी(संजीवनी) घाटावर गुरू शुक्राचार्य महाराजांची पालखी वर्षातून आठ वेळेस वाजत गाजत गंगा गोदावरी नदी भेटीसाठी व किनारी पूजा अर्चना करण्यासाठी याच मार्गाने येत असते म्हणून अशा या पवित्र मार्गास गुरू शुक्राचार्य महाराज पालखी रस्ता हे नाव देण्यात यावे देवस्थानच्या वतीने अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड यांनी देखील दि २ मार्च २०२० रोजी कोपरगाव नगरपालिकेला लेखी निवेदनाद्वारेही नाव देण्याची मागणी केली आहे.
परंतु आता दहा महिने उलटूनही प्रशासनाच्या वतीने कोणतीच कार्यवाही होतांना दिसत नाही लवकरच या देवस्थानचा सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्र येत आहे. तरी या उत्सवाच्या अगोदर वरील मागणी प्रशासनाने पूर्ण करावी समस्त मंदिर प्रशासनाच्या वतीने व श्रद्धाळू भक्तांच्या वतीने कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत