शिवसेना पदाधिकाऱ्याचे फेसबुक अकाउंट हॅक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेना पदाधिकाऱ्याचे फेसबुक अकाउंट हॅक

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)    राहुरी कारखाना येथील शिवसेनेचे शहर प्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन पत्नी अजारी असल्याने पैसे पाठव...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

   राहुरी कारखाना येथील शिवसेनेचे शहर प्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक अकाऊंट हँक करुन पत्नी अजारी असल्याने पैसे पाठवण्याचा मेसेज करुन गव्हाणे यांच्या चार ते पाच मिञा कडून हँकर्सने चाळीस ते पन्नास हजार रुपयांना गंडा घातला.वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सर्व मिञांना मेसेज व फोनवर संपर्क केल्याने पाच लाखा पेक्षा जास्त रक्कम हँकर्सकडे जाण्यापासुन वाचली आहे.

   

   याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी कारखाना येथील शिवसेनेचे शहर प्रमुख विजय गव्हाणे यांचे फेसबुक अकाऊंट सोमवारी राञी 11 वा. बेंगलोर येथील तरुणाने हँक करुन फेसबुकद्वारे मिञांकडे दवाखान्यासाठी पैशाची मागणी करणारा मेसेज टाकुन मिञांना मदत करण्याची विनंती केली. याच मेसेजला प्रतिउत्तर म्हणून अनेक मिञांनी मेसेज टाकला पैसे कशासाठी पाहिजे.याला उत्तर देताना पुणे येथील आदित्य हाँस्पीटल मध्ये पत्नीवर उपचार चालू आहे.त्यासाठी पैशाची गरज आहे.दोन ते तीन दिवसात परत करण्याचे हँकर्सने आश्वासन दिले. या मेसेजला प्रतिसाद देत चार ते पाच मिञांनी चाळीस ते पन्नास हजार रुपये पाठविले.इतर मिञही पैसे पाठवण्याच्या तयारीत असताना एक मिञ पैसे टाकण्यासाठी चालला असताना देसवंडी ता.राहुरी येथील मिञाने  फेसबुक वरील मेसेज पाहुण घेतला.परंतु गव्हाणे हे जास्त टाइपिंग करत नाही  व फेसबुक अकाऊंटही जास्त चालवत नसल्याची माहिती त्या मिञाला असल्याने  खाञी करण्यासाठी गव्हाणे यांना फोनवर संपर्क साधला असता तुम्हाला पैशाची गरज आहे का? असा प्रश्न केला. त्यावेळी गव्हाणे याने मला पैशाची गरज नाही व कोणी पैसे पाठवू नका.त्यावेळी आपले फेसबुक अकाऊंट हँक करण्यात आल्याचे लक्षात आले.

               फेसबुक अकाऊंट हँक झाल्याचे गणपत गव्हाणे,विष्णू कर्जुले (नेवासा),सोनल शेख (राहुरी),नरेंद्र मेहेंद्रु यांनी विजय गव्हाणे यांना फोन करुन माहिती दिली.पैशाची मागणी करीत असल्याचे सांगितले.याच मिञांनी कोणीही पैसे पाठवू नये असे सोशलमिडीयाद्वारे संपर्क करुन सांगितले.विजय गव्हाणे यांनी फेसबुकद्वारे माझे फेसबुक अकाऊंट हँक झाले आहे.मला पैशाची गरज नाही. मिञाने पैसे पाठवू नका.असे आवाहन करीत असताना हँकर्स तो मेसेज दर पाच मिनिटाला डिलेट करीत होता.

            पाथरे ता.राहुरी येथील माऊली टेकाळे यांनी श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे यांच्या कार्यालयातील सायबर क्राईमकडे फेसबुक हँक करुन चाळीस ते पन्नास हजार रुपयांना गंडा घातल्याची तक्रार दाखल केली आहे. तर विजय गव्हाणे यांनी नगर येथील सायबर क्राईमकडे स्वतंञ तक्रार दाखल केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत