कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरातील शंकरनगर, कर्मवीर नगर, ओम नगर, गवारे नगर, द्वारका नगरी व सह्याद्री कॉलिनी येथील स्ट्रीटलाईट व रस्त्याचे डा...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरातील शंकरनगर, कर्मवीर नगर, ओम नगर, गवारे नगर, द्वारका नगरी व सह्याद्री कॉलिनी येथील स्ट्रीटलाईट व रस्त्याचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन व गटारी भुमिगत करून मिळावे या करिता कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने कार्याध्यक्ष संदीप कपिले यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले.
या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे की, कर्मवीर नगर मधील रस्ते व स्ट्रीटलाईट व पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन औताडे घर ते पिंजारी घरापर्यंत, निकम घर ते धापटकर घरापर्यंत, सह्याद्री कॉलिनी व द्वारकानगरीमध्ये स्ट्रीटलाईट,शंकर नगर मधील रस्ते व ओमनगर व शंकर नगरला जोडणारा पुल,ओमनगर मध्ये पिण्याचे पाणी कमी येत असल्याने पाईप लाईन ८ इंच करण्यात यावी,भुमिगत गटारी करणे, जंगम घर ते डॉ. मेमाणे घरापर्यंत गटारीचे पाणी वाहत असल्याने तिथे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे माणसांचे राहणीमान धोक्यात आले आहे, गवारे नगर मधील रस्ते स्ट्रीटलाईट व पुल करण्यात यावा व तसेच पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करून द्यावी. या मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहे .तसेच कपिले यांनी सदर निवेदनात म्हटले आहे की सदर कामा बाबत कोपरगांव नगरपालिकेला तोंडी व लेखी वारंवार सुचना देऊन ही नगरपालिका दुर्लक्ष करीत आहे.
शंकर नगर, कर्मवीर नगर, ओम नगर, गवारे नगर, द्वारका नगरी व सह्याद्री कॉलिनी या भागात वरील प्रमाणे नागरी सुविधा लवकरात लवकर पुर्ण करून मिळाव्या. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी , काँग्रेस , डॉक्टर अमरीश मेंमाने, माधुरीताई शिलेदार, कविताताई शिलेदार, सुभाष बनकर, सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख ,कुंडलिक शिरसाठ, माधव पोटे, विलास मेहरखांब, बाळासाहेब तरवडे, योगेश उदावत ,सुहास शिरसागर,सुमेश हांडे, नितीन अडागळे, वाकचौरे सर, अनिकेत बनसोडे यांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत