राहूरी प्रतिनिधी राहुरी येथिल मराठा बहुऊद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कोरोना रोगाच्या पार्...
राहूरी प्रतिनिधी
राहुरी येथिल मराठा बहुऊद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरीत होवून समाजातील अडचणीत असलेल्या कुटूंबांना मदत केली.
वांबोरी येथील मंथना पागिरे या भगिनीचे पती भरत पागिरे जीवघेण्या अपघातात जायबंदी होऊन सुमारे एक वर्षांहून अधिक काळापासून बिछान्यावर आहेत.एक शस्रक्रिया झालेली.त्यांच्यावर डोक्याच्या कवटीची अजून एक शस्रक्रिया करणे बाकी होते.परंतु यापूर्वीच्या उपचारांसाठीच जवळचा सर्व पैसा संपला.नातेवाईकांनीही शक्य होईल तितकी मदत केली पण पतीचे औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चामुळे या मायमाऊलीचा संसाराचा गाडा मेटाकुटीला आलेला.घरी शेतीवाडीही नाही किंवा उत्पन्नाचे दुसरे काहीही साधन नाही.त्यातच पतीच्या पुढील शस्रक्रियेची तारीख जवळ आलेली.दैनंदिन खर्च तर चुकत नव्हता.जवळ तर काहीच पैसे नाहीत.परंतु मंथनाताईंनी परिस्थितीपुढे हार न मानता जिद्दीने या अडचणीसोबत दोन हात करायचे ठरवले.शिकलेल्या असूनही त्या दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करुन पैसे उभे करु लागल्या.दरम्यान राहुरी येथील मराठा बहुऊद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांना वांबोरी येथिल आदिनाथ मोरे यांनी पतीच्या उपचारांसाठी हतबल झालेल्या या माऊलीच्या संघर्षाची कहाणी सांगितली.
प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त समाजातील गरजू कुटूंबाना मदत करण्याचा मराठा एकीकरण समिती आयोजित शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने उपक्रम राबविण्यात येत असतो.या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट वांबोरीला येऊन पागिरेताईंची भेट घेतली.प्रत्यक्ष पेशंटला भेटून त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि खात्री पटल्यानंतर सरळ निधी जमवायला सुरुवात केली.ज्या हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया होणार होती तेथील तज्ज्ञ डॉक्टरांशीही चर्चा करुन याबाबत माहिती घेतली.वांबोरी येथील संवेदनशील मनाचे डॉक्टर योगेश पानसरे यांनीही आत्तापर्यंत केलेल्या उपचारांबाबत माहिती तपशीलवार सांगून या पदाधिकाऱ्यांना मोलाची मदत केली.शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या बहिणीला मदत करता यावी म्हणून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षातही आवाहन केले गेले.या सर्वांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दोनच दिवसात ९४०००/- (चौरॕन्नव हजार रुपये) निधी गोळा झाला.
शिवजयंती उत्सव समिती पूर्ण कार्यकार्यणीचा मान यावर्षी महिलांना देण्यात आला होता.याच मराठमोळ्या महिलांनी देखील पुढे येऊन यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या एकूण खर्चाचा रु.६३०००/- (त्रेसष्ठ हजार रुपये) मंथनाताईं पागिरे यांना थेट नगर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन या अश्विनी कल्हापुरे,वैशाली शेळके,राजश्री घाडगे,लगे सुजाता,रुपाली रासने,जानका लबडे,वर्षा लांबे,दिपाली अडसुरे,ज्योती नालकर,पुनम शेंडे धनादेश दिला आणि शस्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.पेशंटच्या आणि मंथनाताईंच्या चेहऱ्यावर असलेली मराठा एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांबद्दलची कृतज्ञता यावेळी लपून राहिली नाही..!
राहुरी खुर्द येथील चि.श्रीनाथ राजू भांड या (वय १६ वर्ष) विद्यार्थ्याला ही ब्लड कॅन्सर वरील उपचारांसाठी आर्थिक मदतीची नितांत गरज होती.श्रीनाथचे वडील राजू भांड हे देखील इस्त्रीचा व्यवसाय करुण कुटूंब चालवत आहेत.परंतु श्रीनाथला कॕन्सर झाल्यामुळे उपचारासाठी ते देखील हतबल झालेले आहेत.उपचार करण्यासाठी सातत्याने पैसे लागत आहेत.घरची परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने समाजातील दानशूर लोक मदत करत आहेत.मराठा एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या पालकांनाही जमा झालेल्या या रकमेतून मदतीचा ३१०००/-(एकतीस हजार रुपये) धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी मराठा बहुऊद्देशिय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे,उपाध्यक्ष राजेंद्र लबडे,खजिनदार संदिप गाडे,महेंद्र शेळके,मच्छिंद्र गुंड,बंडूशेठ उर्फ अनिल घोरपडे,नरेंद्र शेटे आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत