कोपरगावात थकबाकीदाराची दुकाने नगरपालिकेकडून सील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात थकबाकीदाराची दुकाने नगरपालिकेकडून सील

  कोपरगाव प्रतिनिधी कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व इतर कर  वसुलीसाठी कोपरगांव नगरप...

 कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व इतर कर  वसुलीसाठी कोपरगांव नगरपरिषदेने आज दिनांक २३ मार्च २०२१ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपमुख्याधिकारी  सुनील गोर्डे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत थकबाकी दाराची दुकाने सील केली आहे. या कारवाई मुळे व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.

मार्च अखेर मुळे सगळीकडे शासकीय कराची वसुली मोहीम जोरात सुरू असून  यात आज कोपरगाव नगरपालिकेने देखील उडी घेत  जुनी मराठी शाळा शॉपिंग कॉम्प्लेक्स व बी.ओ. टी.शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील सहा गाळे नगरपालिकेच्या पथकाने  सील  केली आहे. थकबाकी दार काही  काही गाळेधारकांनी भाडे व करापोटी ची रक्कम  जागेवर   चेक व  रोख रक्कम भरत आपल्यावर होणारी कारवाई टाळली आहे.


 यापुढे गाळे भाडे व शासकीय  कर थकीत असलेले गाळे ताब्यात घेऊन त्याचा फेर लिलाव करण्यात येणार आहे.  अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून थकबाकीदार व्यक्तींनी अपल्याकडे असलेले थकीत कर त्वरित भरून आपणावर होऊ घातलेली कटू कारवाई टाळावी असे  आवाहन मुख्याधिकारी यांनी शहरवासीयांना केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत