कोपरगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन कोपरगाव मनसे शहर व तालुक्याच्या वतीने...
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन कोपरगाव मनसे शहर व तालुक्याच्या वतीने गांधी चौक येथे स्व. बबलु भाऊ परदेशी वाचनालय येथे मनसे सभासद नोंदणी अभियान मनसे जिल्हाध्यक्ष दत्तु भाऊ कोते, कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आले.
या वेळी कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला या वेळी अनेकांनी फाॅर्मव्दारे तर काहिंनी ऑन लाईन सभासद नोंदणी करुन घेतली.
या वेळी जिल्हाध्यक्ष दत्तु भाऊ कोते व शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांना मनसे पक्षात प्रवेश करुन आपले सभासदत्व नोंदविली जिल्हाध्यकक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांना पदे वाटण्यात आली कोपरगाव मनसे महिला शहराध्यक्ष पदि पुजा योगेश एखंडे तालुकाध्यक्ष पदि सरला नवनाथ मोहिते, तर उपतालुकाध्यक्ष पदि रेणुका राजेंद्र जाधव यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी अलीमभाई शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे,विजय सुपेकर, उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते संजय जाधव संजय चव्हाण,हिंदु सम्राट संस्थापक बापु काकडे,विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी ,उपतालुकाध्यक्ष सागर महापुरे, उपशहराध्यक्ष संजय जाधव वाहतूक तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख, शहराध्यक्ष सचिन खैरे, विद्यार्थी जिल्हा संघटक बंटि सपकाळ, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, सुनिल सुपेकर, अतिश शिंदे, रवि मोहिते, विशाल खैरे, सुरज चव्हाण, विक्रम काकडे, राज परदेशी, प्रसाद गवळी, अजिंक्य काकडे, सौरभ पवार, कुणाल गाडे, संदिप नाईक, अभी पवार, रोहित गढई, आदि मनसैनिक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत