पाथर्डी(प्रतिनिधी) पाथर्डी शाखा दुरूस्ती व नवीन फर्निचरच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून पाथर्डी शाखा दुरूस्तीचा संपुर्...
पाथर्डी(प्रतिनिधी)
पाथर्डी शाखा दुरूस्ती व नवीन फर्निचरच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून पाथर्डी शाखा दुरूस्तीचा संपुर्ण आर्थिक व्यवहार पुर्ण झालेला असून आता वाढीव जी एस टीचे बीले काढण्याचा सत्ताधा-यांचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.जर सेवा कराच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम अदा झाल्यास जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष तुषार तुपे यांनी दिला आहे.
सदर कामाची १० डिसेंबर १९ रोजी वर्तमान पत्रात जाहिरात देण्यात आली होती .त्याप्रमाणे १५ जानेवारी २० रोजी सिव्हिल वर्क करिता १०,६७,००० व फर्निचर करिता ८,५०,२०० इतक्या रक्कमेचे सेवाकरासह टेंडर मंजूर करून कार्यरंभ आदेश देण्यात आला.काम सुरू होण्यापुर्वीच ११ लाखरूपये एव्हढी मोठी रक्कम संबंधित फर्मला आगाऊ आदा करण्यात आली.तसेच वेळेत काम सुरू न झाल्यामुळे टेंडर मधील अटी व शर्तीनुसार दंड होणे अपेक्षित असताना तत्कालीन व्हाइस चेअरमन साहेबांनी तो दंड माफ करत बँकेच आर्थिक हित जोपासण्या ऐवजी ठेकेदारावर एव्हढी मेहेरबानी का दाखवली हे कोड न उलघडणारे आहे.
त्यानंतर बांधकाम पुर्ण होण्या अगोदरच संबंधित ठेकेदारास संपुर्ण कामाची १९,१७,२०० एव्हढी रक्क़म अदा केली.या संपूर्ण व्यवहारात पाथर्डी शाखेचे संचालक संतोष अकोलकर यांना कुठेही विश्वासात न घेता घाईघाईने उदघाटनही करण्यात आले. सेवाकर नियमाप्रमाणे बील अदा करतानाच एकूण बीलावर १२ % टक्के सेवाकर आकारला जातो.
मग संबंधित शाखेचे काम पुर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असताना आता ३ लाख ५० हजार एव्हढ्या रक्कमेचे अतिरिक्त जी एस टी चे बीले काढण्याचा सत्ताधा-यांचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून जर सेवा कराच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम अदा झाल्यास जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्याचा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष तुषार तुपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत