राहुरातील तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरातील तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या

  राहूरी(वेबटीम) राहाता तालुक्यातील  लोणी येथे इरिगेशन परिसरामध्ये कॅनॉल च्या शेजारी कच्चा रोडवर  अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला सदर घटनेची लोण...

 राहूरी(वेबटीम)

राहाता तालुक्यातील  लोणी येथे इरिगेशन परिसरामध्ये कॅनॉल च्या शेजारी कच्चा रोडवर  अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली  असता सदरचा मृतदेह हा  अर्जुन अनिल पवार (वय २५,रा बारागाव नांदूर) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.   या प्रकरणी दीपक डोळस व विठ्ठल कावळे (दोघे रा.राहूरी) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील करत आहेत.

 अवघ्या तीन तासात  कुठलाही पुरावा नसताना गुन्ह्याचा तपास करण्यात लोणी पोलीस स्टेशनला यश आले सदर घटनेचा तपास हा  जिल्हा पोलीस अधीक्षक  मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  अप्पर पोलीस अधीक्षक  डॉ  दिपाली काळे मॅडम  यांच्या नेतृत्वाखाली व उपविभागीय अधिकारी संजय सातव ,लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, पो.हे.कॉ संपत जायभाये ,ए.एस.आय घोडे, पोलीस हवालदार वांडेकर, पोलीस नाईक धामणे,पोलीस नाईक देशमुख ,पोलिस नाईक दीपक रोकडे, पोलीस नाईक शरद पवार यांनी कामगिरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत