देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) कोरोना काळात येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तत्पर राहयचे आहे.अन्यथा कोणाची गय केली जाणार नाही.देवळाली प्रवर...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
कोरोना काळात येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तत्पर राहयचे आहे.अन्यथा कोणाची गय केली जाणार नाही.देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिवस राञ एक करीत काम केले.कामाची शाबासकी दुरच राहिली पण चुकीच्या माहितीच्या आधारे येथील वैद्यकीय अधिकारी यांना भर बैठकीत खरडपट्टीचा कार्यक्रम झाला. काम करणाऱ्यांना धतुरा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या उडाण टप्पूंना माञ पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आ.लहू कानडे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात देवळाली प्रवरा नगरपरिषद व 32 गावातील गावच्या विकास कामासंदर्भात आयोजित शासकीय अधिकारी व निवडक लोकप्रतिनिधीच्या बैठकीत आ.कानडे यांनी कोरोना संदर्भातील कामकाजाचा आढावा घेत असताना देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ए.बी मासाळ यांच्या वतीने साहय्यक वैद्यकीय अधिकारी डाँ.जाकीर शेख उपस्थित होते.यावेळी कोरोनाच्या कामकाजावरुन आ.कानडे यांनी डाँ.शेख यांना खडेबोल सुनावले.तालुक्यात कोरोना काळात सर्वाधिक काम देवळाली प्रवरा प्राथमिक केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.याबाबत नागरीकांनी समाधान व्यक्त करुन दाखविले होते. परंतू आ.कानडे यांनी चुकीच्या माहितीच्या अधारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनवले.याबद्दल नागरीकांसह अधिकारी वकर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील,उप विभागीय अधिकारी दयानंद जगताप,तहसीलदार फसीयोद्दीन शेख,गटविकास अधिकारी खामकर,सचिन गुजर,ज्ञानेश्वर मुरकुटे,नगरसेवक आण्णासाहेब चोथे,प्रकाश संसारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार लहू कानडे म्हणाले कि, 'सर्वसामान्य माणसांच्या झोपडीपर्यंत जाऊन अधिकाऱ्यांनी प्रश्न समजावून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत,गोरगरिबांच्यासाठी धावून जाणारे अधिकारी जनता कायमस्वरूपी लक्षात ठेवते, त्यामुळे सरकारच्या योजना शेवट पर्यंत गेल्या पाहिजेत,देवळाली प्रवरा परिसरातील 32 गावासाठी विकास कामांना लागणारा निधी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणुन कमी पडू दिला जाणार नाही,त्यासाठी सर्व विभागाने पाठपुरावा करावा, कोविड साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि औषधोपचारांची गरज असलेल्या रुग्णासाठी देवळाली प्रवरा मध्येच सोय करावी,त्यासाठी नगर पालिकेचे सहकार्य घेण्यात यावे, महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्तपदी ची अंमलबजावणी करून अतिक्रमण धारकांचे प्रश्न,बेघरांचे प्रश्न वेळेत सोडवले पाहिजेत, जे शासकीय अधिकारी काम करणार नाहीत,त्यांची गय केली जाणार नाही. असे आ.कानडे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आमदारांवर नाराजी!
श्रीराम मंदिर वर्गणीवरून केलेल्या वक्तव्यावरून आ.लहू कानडे यांच्या विरोधात देवळाली प्रवरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन लाज काढण्यापर्यंत कडाडून टीका केली. त्याच नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून आ. कानडे यांनी बैठक घेतली. आ. कानडे यांनी देवळाली प्रवरातील बैठकीचे निमंञन महाविकास आघाडीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिले नाही. बैठकीपुर्वी किंवा बैठकीनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना भेटले नाही. नेहमी प्रमाणे श्रीरामपुरातील काँग्रेसचे पदाधिकारी यांना गाडीत बसवून य बैठकीस घेऊन आले. ३२ गावातील अनेक काँगेस कार्यकर्ते या बैठकीला होते. मात्र देवळाली प्रवरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना याची पुसटशी कल्पना दिली नसल्याने आ. कानडे यांच्यावर देवळाली प्रवरा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी स्वागत करून परिसरातील पाटबंधारे,वीज मंडळ व इतर विभागाच्या अडचणी मांडुन अशी बैठक आयोजित केल्या बद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, 'नगर पालिकेने पुर्वी कोविड सेंटर उभारले असुन आरोग्य यंत्रणेला आवश्यकता असल्यास परिसरातील नागरिकांसाठी ते उपलब्ध करून देण्यात येईल तसेच संस्थेची रुग्णवाहिका देण्यात येईल,ड्रायव्हर व डिझेलचा खर्च प्रशासनाने करावा, शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत द्यावी,हप्ते पाडून दिल्यास शेतकरी ते भरतील,त्यासाठी अडवणूक करू नये.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड,डॉ. जाकीर शेख,डॉ.श्रीकांत पाठक, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ,पाटबंधारे उपअभियंता एस. के. सिनारे,भुमी अभिलेखचे उपअधीक्षक वाय.बी.थोरात, सहा.निबंधक डी.सी.नागरगोजे, पोलिस उप निरीक्षक एम.इ. शिंदे,जि.प.चे शाखा अभियंता आप्पा हंगे,सहा.कार्यकारी अभियंता वाय.एच.कोकरे,वीज मंडळा उप कार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत