कोपरगावात 8 मे पर्यंत कडक ‘जनता कर्फ्यू’ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात 8 मे पर्यंत कडक ‘जनता कर्फ्यू’

  कोपरगाव(वेबटीम) तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मृत्यूदरही वाढल्याने 30 एप्रिल ते 8 मे दरम्यान कडक ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्...

 कोपरगाव(वेबटीम)

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मृत्यूदरही वाढल्याने 30 एप्रिल ते 8 मे दरम्यान कडक ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येणार आहे. 

या दिवसांत केवळ रुग्णालये आणि सकाळी 7 ते 11 या वेळेत दूध व पाण्याच्या जारची विक्री सुरू राहील.किराणा, फळेविक्री व इतर आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय आज सर्वपक्षीय कोरोना नियंत्रण समितीतर्फे घेण्यात आला. या ‘जनता कर्फ्यू’मुळे कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास निश्चित मदत होणार आहे, असे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व सर्व नगरसेवकांनी सांगितले.


 पालिका सभागृहात कोरोना नियंत्रण समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन या बाबी रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. परिणामी, मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.30) रात्री आठपासून शनिवारी (8 मे) सकाळी सातपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत