शेतकऱ्यावर गोळीबार करणारा सराईत आरोपी जेरबंद प्रयत्न करण्या-या शेळी चोरास अटक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्यावर गोळीबार करणारा सराईत आरोपी जेरबंद प्रयत्न करण्या-या शेळी चोरास अटक

  कर्जत :  प्रतिनिधी        निंबोडी येथे शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या 'त्या' शेळीचोरांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. यातील एक सर...

 

कर्जत :  प्रतिनिधी 


      निंबोडी येथे शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या 'त्या' शेळीचोरांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. यातील एक सराईत आरोपी पोलिसांनी जेरबंद केला असून, त्याचा साथीदार पसार झाला आहे. 

बापु गणपत गरड रा. निंबोडी ता. कर्जत जि. अहमदनगर यांची शेळी चोरुन घेवनु जात असल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी आरडा ओरडा करुन त्यांचा भाऊ खंडु व भाचा किसन असे जागे होवुन डांबरी रस्त्याकडे पळत गेले.  त्यावेळी त्यांना शेळी घेवुन जात असतांना दिसले असता बापु गणपत गरड मोटरसायकलवर पळुन जात असलेल्या आरोपीस पाठीमागुन कवळ घालुन धरुन ठेवले असता त्यांचे झटापटीत आरोपीने त्याचेकडे असलेल्या गावठी कटयामधुन गोळीबार करुन खंड़ किसन गरड, भरत दिनकर बर्डे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन पळुन गेले.


सदर घटने बाबत कर्जत पोलीस स्टेशन गुरनं २१३/२०२१ भादवी कलम ३०७,३७९,५११,३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता जखमीवर अहमदनगर येथे औषध उपचार चालु होता दाखल गुन्हयाचे घटना स्थळास मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत श्री अण्णासहेब जाधव यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देवुन सदर अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्याने, कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांनी वरीष्ठांचे सुचना नुसार कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार करुन मार्गदर्शन करुन गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापुर, बीड जिल्हयातील रेकॉर्डवरील १०० पेक्षा जास्त आरोपी चेक केले. चंद्रशेखर यादव, सपोनि सुरेश माने, पोसई अमरजित मोरे व टीमने केलेल्या तपासा मध्ये सदरचा गुन्हा हा  अमर दत्तु पवार रा. आरणगाव ता.जामखेड, करण पंच्याहत्तर काळे रा. पाथरुड जि. उस्मानाबाद यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्या अनुषंगाने नमुद आरोपीच्या शोध घेतला असता नमुद आरोपी हे पोलीस पथकाला सतत हुलकावणी देत होते. दिनांक 21 रोजी नमुद आरोपी हे पाथरुड, वडगाव नळी परिसरात फिरत असल्याचे कर्जत पोलीस पथकाला समजल्याने पोलीस निरीक्षक यादव, सपोनि सुरेश माने व पो.उनि. अमरजीत मोरे यांनी दोन दिवस सदर परीसरात थांबवुन तेथील भौगोलीक परीस्थीतीची माहिती घेवुन दिनांक २२ रोजी रात्री सापळा लावुन सदर डोंगरावर आरोपी अमर दत्तु पवार वय २६ वर्ष रा. आरणगाव ता. जामखेड जि. अहमदनगर यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. दुसरा आरोपी करण पंच्याहत्तर काळे रा.पाथरुड ता भुम हा पळुन गेला आहे. ताब्यात घेतलेला आरोपी अमर पवार यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे करत आहेत. सदर 


अटक आरोपी विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.-*

१) १८५/२०१६ भादवी कलम ३९४ नेवासा पोलीस स्टेशन

२)२९४/२०१६ भादवी कलम ३९७,३९४३४२, नेवासा पोलीस स्टेशन 

३)३९२/२०१५ भादवी कलम ३७९,३४पाथर्डी पोलीस स्टेशन .. 

४) २५७/२०१६ भादवी कलम ३९७,३४१,४२७, नेवासा पोलीस स्टेशन

५) १५८/२०१६ भदवी. कलम ३९४ नेवासा पोलीस स्टेशन ६)३४३/२०१६, भादवी कलम २२४,४२७,५११ नेवासा पोलीस स्टेशन

७) २६६ / २०१६ भादवी कलम ३९५,४५२, ५११,४१२ नेवासा पोलीस स्टेशन 

८)२४९/२०१६ भादवी कलम ३९५,३९७ करमाळा जि. सोलापुर 

९) ११/२०१७ आर्म अॅक्ट ३,७,२५ नेवासा पोलीस स्टेशन 

१०)११/२०१६ आर्म अॅक्ट ३,७,२५ नेवासा पोलीस स्टेशन 

११)३८/२०१५ आर्म अॅक्ट ३,७,२५ नेवासा पोलीस स्टेशन

.


सदरची कारवाई. पोलीस अधिक्षक सो श्री मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस उपअधीक्षक श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उप निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, सुनील चव्हाण, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, महादेव कोहक, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, अमीत बर्डे, गणेश काळाने, रविंद्र वाघ, महीला अंमलदार कोमल गोफणे, सचिन राठोड मोबाईल सेल, किरण बोराडे, दादा टाके श्रीगोंदा पोस्टे जामखेड पोस्टेचे डि बी पथकातील पोलीस अंमलदार यांची मदत झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत