राहुरीत दारूचे तिप्पट भाव वाढल्याने मद्यपीना चढेना .! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत दारूचे तिप्पट भाव वाढल्याने मद्यपीना चढेना .!

 राहुरी : प्रतिनिधी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांच्या आदेशाने ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले ...

 राहुरी : प्रतिनिधी 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांच्या आदेशाने ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लाॅकडाऊनचा गैरफायदा घेऊन राहुरी तालुक्यातील काही दारू व्यावसायिक चढ्या भावाने दारूची विक्री करत असल्चे चित्र पहावयास मिळत आहे. 

         महाराष्ट्र राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या या महामारीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांच्या आदेशानूसार काही नियम अटी घालून ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र काही नियम अटी घालून अत्यावश्यक सेवेसह दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र राहुरी तालुक्यातील अनाधिकृत व अनाधिकृत दारू विक्रेते याचा गैरफायदा घेऊन चढ्या भावाने दारू विक्री करत आहेत. त्यामुळे तळीरामांना डबल भावाने दारूची खरेदी करावी लागत आहे. अत्यावश्यक सेवेसह सर्वकाही बंद असताना दारू विक्रेत्यांना मात्र सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक २४ एप्रिल रोजी राहुरी शहरातील एका वाईन्सच्या दुकानात चढ्या भावाने दारू विक्री करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. राहुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गर्दीला पांगविण्यात आले. 

       दुपारी उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू होती. तालूक्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे चढ्या भावाने दारू विक्री सुरू आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लक्ष घालून कारवाई करणे अपेक्षित आहे. याबाबत पोलिस प्रशासन काय कारवाई करणार याकडे तळीरामांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत