जिल्ह्यात चार महिन्यात 20 शेतकरी आत्महत्या ; पाच वर्षात 700 कुटुंब पोरके ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात चार महिन्यात 20 शेतकरी आत्महत्या ; पाच वर्षात 700 कुटुंब पोरके !

 नगर : यश शेजुळ                                                     जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून कोरोनाने हाहाकार उडवला आहे, त्याचा सर्वच उद...

 नगर : यश शेजुळ       


                                           
 जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून कोरोनाने हाहाकार उडवला आहे, त्याचा सर्वच उद्योग धंद्यावर परिणाम होऊन अर्थकारणाला मरगळ आली आहे, त्यात शेतकरीही अपवाद नाही. शेतमालाला योग्य बाजारपेठ व हमीभाव नसल्याने शेती आणि शेतकरी उध्वस्त होत आहे. शेतीचे गणित जुळत नसल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे, अगदी या कारणाने हताश झालेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 91 आणि या चार महिन्यात तब्बल 20 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.       
     

       शेतकरी हा मुळातच भोळा आणि प्रामाणिक आहे. मात्र, त्याच्या याच स्वभावाचा फायदा घेऊन स्वातंत्र्यानंतरही त्याला गुलामगिरी सहन करावी लागत आहे. गोरे गेले, काळे आले, मात्र शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. एकीकडे कृषीखतांची मूल्ये वाढत आहेत, मात्र, शेतमालाचे भाव अजूनही कवडीमोल आहेत. त्यात, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीसारखी नैसर्गिक संकटे आणि कधी सरकारची सुलतानी धोरणे यामुळे शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. सर्व वस्तूंचे भाव ठरविण्याचा अधिकार हा संबंधित उत्पादकांना असताना इकडे शेतकऱ्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तसेच चंद्राच्या अपुऱ्या प्रकाशात विंचू, काट्याची पर्वा न करता पिकवलेल्या शेतमालाचे भाव मात्र त्याला ठरविण्याचे अधिकार नाहीत. बाजार समित्यामधील आडती, व्यापारी शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत असताना शासन डोळ्याला पट्टी बांधून धृतराष्ट्र बनले आहे. शेतकऱ्यांना नेहमीच शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. भरपाई कधी वेळेवर नाही, दिलीच तर ती तुटपुंजी, पिकविम्यातही शेतकऱ्यांचेच खिसे कापले आहेत, कांद्याला कुठं बरा भाव आला की लगेच निर्बंध, बाहेरून आयात, ऊस नगदी पीक मात्र यावर कारखानदारच गब्बर झाले, शेतकर्यांच्या उसाची एफआरपी चोरली जात आहे, उपपदार्थ उत्पन्न स्वतःच्या घशात घातले जात आहे,  शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायात देखील त्याची लूटमार सुरू आहे, पशुखाद्य भाव वाढले मात्र दुधदर कमीच आहेत, येथेही शेतकऱ्याचं गणित जुळत नाही, घेतलेली उचल फेडताना अखेर त्याच्या गायी विकुनही कर्ज तसेच राहते. या सर्व अन्यायकारक धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. एकीकडे असा अन्याय सुरू असताना दुसरीकडे ज्या बँकानी कर्ज दिले, त्यांची तगादे सुरू असतात, सावकार दारात येऊन बसतो, घरातील आजारपण, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, पुढच्या पिकाचे नियोजन या सर्व चिंतेत शेतकरी व्यथित होतो आणि त्याचा स्वाभिमान जागा होऊन, आपण कर्ज फेडू शकत नाही आणि बुडवण्याची आपली खोटी नियत नाही, त्यामुळे या संघर्षात तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो.  गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर शेतकरी आत्महत्या हा गँभिर विषय बनल्याचे समोर येते.
सन 2015 साली 118, सन 2016 - 144, सन 2017 -140, सन 2018 -90, सन 2019-127, सन 2020 - 91 शेतकरी आत्महत्या आणि जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या चार महिन्यात 20 शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली आहे.  आशा प्रकारे गेल्या पाच-सहा वर्षात 700 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही सर्व कुटुंबे पोरकी झाली आहेत, शासन आर्थिक मदत देते, मात्र ती पुरेशी नसते, तसेच यातही अटी व नियम घालून शासनाच्या नियमात आत्महत्या केली असेल तरच त्या कुटुंबाला मदत केली जाते, 2001 पासून 453 शेतकरी कुटुंब असे आहेत की त्यांना शासनाची ही मदत देखील मिळाली नाही. त्यामुळे खर्याअर्थाने शासन शेतकऱ्यांविषयी जीवंतपणे सकारत्मक नाहीच, मात्र मृत्यूनन्तरही ते नकारात्मकच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत