18 एकर भूखंडातून ना.तनपुरेंची 'विकेट' जाणार ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

18 एकर भूखंडातून ना.तनपुरेंची 'विकेट' जाणार ?

  राहुरी : वेबटीम      राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातिर हत्येप्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांन...

 राहुरी : वेबटीम   


 
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातिर हत्येप्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण चिघळले आहे. कर्डीले हे आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत आहेत, तर मंत्री तनपुरे यांनी देखील पुरावे पोलिसात द्या, असे आव्हान केल्याने राहुरीतील हे प्रकरण आता राज्यात गाजणार हे नक्की आहे, दरम्यान, राठोड, देशमुख यांच्यानंतर ना. तनपुरेंचीही राजकीय विकेट घेण्यात विरोधक यशस्वी होणार का ? याकडे लक्ष आहे 
18 एकर भूखंडाचा हा उतारा कर्डीले समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे 

   गेल्या आठवड्यात पत्रकार दातीर यांची अपहरण करून निर्घृण हत्या झाली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली तर यातील आरोपी कान्हू मोरे हा फरार आहे. मात्र मोरे याचा हा धागा पकडून दातीर यांची हत्या ही 'त्या' 18 एकर भूखंडाच्या कारणातून झाली असावी, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ही चर्चा कर्डीले यांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून सार्वजनिक केली. माजी आमदार कर्डीले यांनी मंत्री तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 18 एकर भूखंडावर तनपुरे यांच्या मुलाच्या नावाने इतर हक्कात नोंद असलेली काही प्रॉपर्टी आहे, त्यात त्यांचे मेव्हूनेही भागीदार आहेत.मात्र, या जागेत पत्रकार दातीर हे अडचण ठरत होते, त्यामुळे त्यांना कान्हू मोरे यांच्याकडून धमक्या सुरू होत्या. तशी पोलिसात तक्रार असल्याचेही म्हंटले जात आहे. त्यामुळेच पत्रकार दातीर यांची हत्या केली असावी. या प्रकरणात कोणालाही पाठीशी  न घालता कारवाई करावी, तसेच चौकशी होईपर्यंत तनपुरे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली जात आहे, याशिवाय कर्डीले यांनी या प्रकरणात तनपुरे यांचा समावेश असल्याबाबत आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा गौप्यस्फोट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत हे प्रकरण पोहचवले आहे, महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याची एकही संधी विरोधी पक्ष नेते फडणवीस सोडत नसल्याने त्यांच्या हाती आणखी एक प्रकरण लागले आहे, यात तथ्य किती माहिती नसले तरी ही संधी पकडून त्यांनीही यात हात घातला आहे,  त्यानीही जातीने लक्ष घालत काल महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्यांची विकेट जाईल, असे सूचक वक्तव्य करत पत्रकार हत्येनंतर शांत असलेल्या पत्रकारांना या बाबत आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. 18 एकर भूखंड, त्यात मंत्री तनपुरे यांची सोहम ट्रान्स्पोर्ट कंपनी इत्यादींचाही त्यांनी उहापोह केला असून, हे प्रकरण त्यांनी हातात घेतल्याने राठोड, देशमुख राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे.  तर, मंत्री तनपुरे यांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत संबंधित प्रॉपर्टीबाबत देखील काही माहिती जाहीरपणे दिली आहे. शिवाय, माझ्या विरोधात काही पुरावे असतील तर ते पोलिसात द्या, मी तयार आहे, असे थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे कर्डीले यांच्याकडे असे खरंच कोणते पुरावे आहेत का,  पोलिसात ते पुरावे देणार का ? मंत्री तनपुरेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी आणखी तीव्र होणार का? मंत्री तनपुरे कोणती भूमिका घेणार ? मामा जयंत पाटील  यांची या प्रकरणात प्रतिक्रिया काय असेल ? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. तूर्तास, सोशल मीडियावरही दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांच्याकडून या प्रकरणाला हवा देण्याचे काम सुरू आहे.    
दरम्यान, भाजपने मंत्रिमंडळातुन तनपुरे यांची विकेट घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असली तरी तनपुरे हे मुळात चांगले फलंदाज असल्याने ते प्रसंगी बचावात्मक खेळतील मात्र आपली विकेट ते सहजासहजी आणि तेही कर्डींंलेच्या फिरकीवर तर कधीच सोडणार नाहीत, हे नक्की

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत