मास्टर दीनानाथांचा स्वरप्रवास शनिवारी एबीपी माझावर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मास्टर दीनानाथांचा स्वरप्रवास शनिवारी एबीपी माझावर

  संगमनेर : प्रतिनिधी  ज्येष्ठ नाट्य कलावंत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७९व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून शनिवारी २४ एप्रिल रोजी र...

 

संगमनेर : प्रतिनिधी 


ज्येष्ठ नाट्य कलावंत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ७९व्या पुण्यतिथीचं औचित्य साधून शनिवारी २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ‘एबीपी माझा’वर ‘स्वर मंगेशाचे’ हा खास कार्यक्रम प्रसारित होणार आहे. मंगेशकर कुटुंबियांनी निर्माण केलेल्या या कार्यक्रमात मास्टर दीनानाथांचा स्वरप्रवास रसिकांसमोर उलगडणार आहे. 



गेली अनेक वर्ष मंगेशकर कुटुंबियांकडून मास्टर दीनानाथांच्या पुण्यतिथीला एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्गजांचा या कार्यक्रमात दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवही करण्यात येतो. पण कोरोनामुळे गेली दोन वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन करता आलेले नाही. त्यामुळं यंदा दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीला त्यांचा संगीत-नाट्य क्षेत्रातील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न मंगेशकर कुटुंबीयांनी केला आहे. त्याचे प्रसारण ‘एबीपी माझा’वर होणार आहे. 

या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आपल्या बाबांबद्दलच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. त्य़ाचबरोबर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शोधलेली दीनानाथांच्या लहानपणापासूनची दूर्मिळ छायाचित्रंही या माहितीपटात आहेत. याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र पेंढारकर, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत गोखले, अशोक रानडे यांच्यासह विविध पिढ्यांतील दिग्गज कलाकारांनी दीनानाथांच्या संगीतविश्वातील योगदानाबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचं संकलनही या माहितीपटात केलेलं आहे. या कार्यक्रमाची संहिता ज्येष्ठ गायिका शैला दातार यांची आहे, तर कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य त्यांच्या मानसकन्या प्राची देवल यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत