राहुरी/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांमधे मुळा धरणातुन पाणी सोडण्यात यावे अशी मागणी नामदार...
राहुरी/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांमधे मुळा धरणातुन पाणी सोडण्यात यावे अशी मागणी नामदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेञ विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

२० एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात तनपुरे यांनी म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील वाहणार्या मुळा नदीवरील डिग्रस, मानोरी,मांजरी व वांजुळपोई हे चार कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष सिंचनाद्वारे शेतीस पाणी उपलब्ध होते.त्यामुळे शाश्वत स्वरूपाची पिके घेण्यास शेतकऱ्यांना शक्य होते यावर्षी झालेल्या दिलासादायक पावसाने मुळा धरण हे शंभर टक्के भरलं होते. आजही धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा हा उपलब्ध आहे त्यामुळे कालव्यांद्वारे आवर्तनाचे देखील नियोजन करण्यात आला आहे.परंतु वरील बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळे तेथील लाभधारक शेतकऱ्यांकडून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मुळा धरणातील सध्याचा पाणीसाठा विचारात घेता व आवर्तनासाठी लागणाऱ्या पाणीसाठा विचारात घेता या कोल्हापुर बंधाऱ्यामध्ये पाणी सोडणे जलसंपदा विभागास शक्य आहे. तरी राहुरी तालुक्यातील या चार बंधाऱ्यात मुळा धरणातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत