राहुरी. : प्रतिनिधी येत्या 27 व 28 या दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपा...
राहुरी. : प्रतिनिधी
येत्या 27 व 28 या दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे .असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील ग्रामिण कृषि मौसम सेवा योजना चे सहसमन्वयक रवींद्र आंधळे यांनी बोलताना व्यक्त केले.
रवींद्र आंधळे यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा ताशी वेग 30 ते 40 किलोमीटर राहणार आहे. विजेच्या गडगडाटासह ठीक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .पश्चिम महाराष्ट्रत पुणे अहमदनगर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक जळगाव या भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .आज दिवसभर उष्णता वातावरण होते .दिवसभराच्या उष्णतेमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक व्याकूळ झाले.कांदा व गहू या पिकाला पाऊस घातक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कांदा व गहू हे दोन पिके या दोन दिवसात काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे
अहमदनगर जिल्ह्यात येत्या27/28 या दोन दिवसात विजेच्या कडकडाटासह मध्यम व हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.वाऱ्याचा ताशी वेग 40 किलोमीटर राहील. शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी


कोणत्याही टिप्पण्या नाहीत