गोविंद फुणगे/राहुरी लाॅकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि शहरातील आस्थापन बंद करण्यासाठी राहुरी शहरात पोलिसांच्या व...
गोविंद फुणगे/राहुरी
लाॅकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि शहरातील आस्थापन बंद करण्यासाठी राहुरी शहरात पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह राहुरी पोलिसांनी हे संचालन केल आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राहुरी शहरातील शनिमंदिर परिसर, नवी पेठ आदिंसह शहरात दुकाने बंद केली.मोकाट फिरणा-यावर कारवाई करत पोलिसांनी हे संचलन केले आहे. यावेळी नागरिकांना घरांमध्ये राहण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.सध्या कोरोना महामारी ने मोठा विळखा शहरासह तालुक्यात घातला आहे त्यामुळे नागरिकांनी विनाकारण फिरणं टाळावं आपल्या दुकाना बंद ठेवाव्यात आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले आहे. आणि जर नियमांचे कुणी उल्लंघन केलं तर कुणाचीही गय केली जानार नाही असा इशारा देखील यावेळी दुधाळ दिला आहे.संचलनामधे पो.काॅ.अदिनाथ पाखरे,सचिन ताजने,भगवान थोरात, अशोक कोळगे मेजर,प्रविन आहिरे आदिंसह होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत