आंबी(वेबटीम ) राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. ही समिती ग...
आंबी(वेबटीम )
राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. ही समिती गावचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ग्रामसुरक्षा समिती सोबत स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजना व अंमलबजावणी याविषयी काम करेल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्राम स्तरावर ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.
आंबी येथील कोरोना ग्रामसुरक्षा दलाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब उर्फ जालिंदर रोडे, सचिव विठ्ठल कोळसे, सदस्य आरबाज इनामदार, प्रशांत डुकरे, सचिन राजपूत, संजय फुलमाळी, संकेत रोडे, गणेश पवार राहुल फुलमाळी, राहुल जाधव, तुकाराम साळुंके, दत्तात्रय हुरुळे, गणेश कोळसे यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर अंमळनेर कोरोना ग्रामसुरक्षा दलाच्या अध्यक्षपदी उपसरपंच किरण कोळसे, सचिव अरुण काळे, सदस्य भारत जाधव, सुरेश जाधव, सतिष जाधव, नंदकुमार जाधव कोंडीराम साळुंके, दादासाहेब साळुंके, रविंद्र पाळंदे, गंगाधर साळुंके यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती आंबीच्या सरपंच संगीता बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, पोलिस पाटील सुरेखाताई बाळासाहेब लोंढे, अंमळनेरच्या सरपंच अरुणा भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे, पोलिस पाटील सुरेश जाधव यांच्या दिशा, निर्देशात व मार्गदर्शनाखाली कामकाज करेल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत