देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण न...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहूरी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथील गेल्या ३ दिवसात ४५ कोरोना बाधित रुग्ण आढळून मंगळवार ते गुरुवार पर्यत देवळाली प्रवरात ३३ तर राहुरी फँक्टरी येथे १२ रुग्ण कोराना बाधित आढळल्याने नागरिकांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यंतरी कोरोना बाधित रुग्ण संख्या घटली होती. गेल्या तीन दिवसात राहूरी फॅक्टरी व देवळाली परिसरात ४५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तरी ही नागरिकांनी काळजी घ्यावी मास्क, सँनिटायझर, सामाजिक अंतर ठेवले तरच रुग्ण संख्या कमी होईल.नागरिकांनी पुढाकार घेवून आपल्या पासुन नियम पाळण्यास सुरवात केली तरच कोरोना हद्दपार होवू शकतो.तरच नागरिकांना दिलासा मिळेल पण हे सर्व नागरिकांच्या हातात आहे.
राहूरी तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे.गुरुवार २९ एप्रिल रोजी राहूरी तालुक्यात दिवसभरात १९८ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत