नगर मनमाड रस्त्यावर या ढाब्यावर तोबा गर्दी प्रशासन झोपले की काय ..? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर मनमाड रस्त्यावर या ढाब्यावर तोबा गर्दी प्रशासन झोपले की काय ..?

  राहुरी(वेबटीम) नगर मनमाड महामार्गालगत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या  परराज्यातील एका ढाबा चालका कडून प्रशासना...

 राहुरी(वेबटीम)

नगर मनमाड महामार्गालगत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या  परराज्यातील एका ढाबा चालका कडून प्रशासनाचे नियम पयंदाळी  तुडवले जात असून या धाब्यावर परराज्यातील गिऱ्हाईकांसह स्थानिक नागरिकांच्या पंगती बसत असल्याने कोरोनाला एक प्रकारे निमंत्रण देण्याचा कार्यक्रम सुरू असून नगरपालिका प्रशासन अथवा तालुका स्थरावरील पथक कारवाई का करत नाही असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

कोरोना रुग्ण  संख्या वाढत असल्याने  प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाच्या पूर्ण पणे विरोधात जाऊन नगर मनमाड मार्गावरील एक ढाबा चालक वागत आहे.या ढाब्यावर २४ तास नगर मनमाड मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना तसेच दारूच्या नशेत तर्र झालेल्या स्थानिक तरुणांना खुलेआम जेवणाची व्यवस्था केली जाते. कुठलाही सोशल डिस्टनसिंग न पाळता पंगती उठवल्या जातात .


देवळाली नगरपालिका हद्दीतील या ढाब्याबाबत अनेकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु पालिका कर्मचाऱ्यांचेच हे बसण्या उठण्याचे हे ठिकाण बनल्याने नगर पालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे समोर आले आहे.एक प्रकारे देवळाली नागरपालिकेचे व पोलीस प्रशासनाचे  या ढाबा चालकास पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.येत्या काळात तोबा गर्दी करणाऱ्या या ढाबा चालकावर तहसीलदार शेख कशाप्रकारे लक्ष घालून कारवाई करणार. हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.



दारू प्यायची तर आमच्या ढाब्यावर या..

नगर-मनमाड रस्त्यावरील 'या' ढाब्यावर अनेक जण मद्य पार्सल आणून त्याचा आस्वाद घेत असतात अनेक वेळा रात्री अपरात्री वाद विवादाचे प्रसंगही या ढाब्यावर घडले असतानाही पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कर्मचारी या कडे कानाडोळा करत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले..


पालिका कर्मचाऱ्यांचा पिण्याचा अड्डा?

             नगरपालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा तसेच काही राजकीय मंडळींच्या जवळच्या कार्यकर्त्यांचा हा मद्यपान करण्याचा अड्डा असून तुझ्यावर आमच्या शिवाय कोणीही कारवाई करु शकत नाही. तु आमची सोय करित जा, आम्ही तुझ्या हाँटेलवर कारवाई होवू देणार नाही. असे आश्वासन दिले जाते.त्यामुळे काहीही कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत