आंबी आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करा - जालिंदर रोडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आंबी आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करा - जालिंदर रोडे

आंबी(वेबटीम) मागील वर्षांपासून राज्यभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्यानंतर शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करून कोरोना प्रतिबंध...

आंबी(वेबटीम)

मागील वर्षांपासून राज्यभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्यानंतर शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करून कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करण्यात आली.

         सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी, ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक यांना प्राधान्याने लस देण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास मान्यता मिळाली. नुकताच १ मे नंतर अठरा वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे केंद्र सरकारने घोषित केले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लोकांचा लस घेण्याकडे म्हणावा तसा कल दिसत नाही. याकामी शासन स्तरावर मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या आंबी ग्रामीण आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांसह आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर येथील नागरिकांमधून होत आहे.

       आंबी आरोग्य उपकेंद्र मध्यवर्ती ठिकाणी असून प्रशस्त इमारत आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची उपलब्धता ही जमेची बाजू आहे. येथील नागरिकांना देवळाली प्रवरा येथे लस घेण्यासाठी जावे लागत असल्याने वेळ, पैसा यांचा अपव्यय होत आहे. शासनाने घराबाहेर पडण्यावर निर्बंध घातल्याने लस घेण्यासाठी नागरिक धजावताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने लवकरात लवकर आंबी आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

"आंबी ग्रामीण आरोग्य उपकेंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे. येथे कोरोना लसीकरण सुरू झाल्यास गरीब, आदिवासी, कष्टकरी, दिव्यांग, महिला, वृद्ध बांधवांना लस घेणे सोयीचे होईल. त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होईल. याकामी राहुरीचे तहसिलदार फसियोद्दिन शेख यांना निवेदन दिले आहे.

- जालिंदर रोडे (तालुकाध्यक्ष - धनगर समाज संघर्ष समिती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत