राहुरीच्या तहसीलदारांची कार्य तत्परता! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीच्या तहसीलदारांची कार्य तत्परता!

  राहुरी(प्रतिनिधी)  सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे,रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोविड सेंटर च्या मागण्या जोर धरत आहेत.लोकांना बेड...

 राहुरी(प्रतिनिधी)

 सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे,रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोविड सेंटर च्या मागण्या जोर धरत आहेत.लोकांना बेड मिळणं दूरच पण प्राथमिक उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे.हे वास्तव आहे, पण राहुरी तालुक्यात बेड ची वणवा झालीच नाही त्याचे कारण आहे  तालुक्याचे कार्यतत्पर तहसीलदार एफ.आर.शेख व त्यांच्या टीमची कार्यतत्परता! 

 


 महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या i इमारतींचा पुरेपूर वापर करत सर्व विश्रामगृहे , वसतिगृहे ताब्यात घेऊन जवळपास ६०० बेड क्षमतेचे शासकीय कोविड्ड केअर सेंटर सुरू केले आहे.. बर नुसतेच नावाला सुरू केलेले नाही तर आज मितीस तिथे जवळपास ३२५ रुग्ण उपचार घेत आहे.. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या म्हणल्यावर त्यांना मेडिकल सुविधा, जेवण , स्वछता ,पिण्याचे पाणी व इतर सुविधा लोकांना पुरवायला यंत्रणेवर किती ताण येत असेल.       तरीही राहुरीच्या तहसीलदार, प्रांताधिकारी दैनंदिन आरोग्य यंत्रणा चा आढावा घेऊन जवळपास रोज कोविड सेंटर ला भेट देऊन याची पाहणी करतात. या सोबतच वांबोरी येथे ३० बेड क्षमतेचे शासकीय DCHC सेंटर उभा केले आहे, त्यामध्ये २० बेड ऑक्सिजन चे आहेत,राहुरी शहरातील काही नामांकित डॉक्टर त्यांचे खाजगी कोरोना उपचार रुग्णालये सुरू करण्याच्या विचारात होते, त्यांनाही तहसीलदार साहेबांनी पूर्ण सहकार्य करून त्यांचे हॉस्पिटल मधील सोई सुविधांची पाहणी करून तात्काळ परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे राहुरीत कोरडे हॉस्पिटल, खुरुद हॉस्पिटल, कुलकर्णी हॉस्पिटल आज रोजी कोरोना सेंटर म्हणून काम पाहत आहेत. बर यांना फक्त परवानग्या दिल्या म्हणजे काम संपलं असं नाही, या हॉस्पिटल वर ऑडिटरची नेमनुक  करून रुग्णांची बिला मध्ये फसवणूक होणार नाही याची पण काळजी घेतली आहे. देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीत DCHC सेंटर उत्तम रित्या कार्यरत आहे. याबरोबरच मा.प्रांत साहेब व मा.तहसीलदार राहुरी तालुक्यात कोरोना विषयक सरकारी नियमांचे पालन होईल यासाठीही पोलिस व इतर यंत्रणांच्या मदतीने  सुट्टीच्या दिवशीही अहोरात्र प्रयत्न करून आहेत.

   या सर्व बाबीचा परिणाम झाला म्हणून तालुक्यातील कोरोना बधितांची सोया झाली आहे व त्यांचे नातेवाईकाना दिलासा मिळाला आहे. आजच्या ह्या अत्यंत भयावह परिस्थिती मध्ये केवळ कामाचा दिखावा न करता तालुक्याला आपले कुटुंब मानून मनापासून अहोरात्र झटणाऱ्या प्रांताधिकारी दयानंद जगताप,तहसीलदार एफ आर शेख,पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,नायब तहसिलदार गणेश टिळेकर, फौजदार निलेश वाघ,बीडीओ गोविंद खामकर व तालुका आरोग्य अधिकारी दीपाली गायकवाड व त्यांच्या सर्व टीमला त्रिवार सलाम!

1 टिप्पणी