कायद्याने काम करा, राजकारण्यांचे फोन घेऊ नका, हस्तक्षेप केला तर कारवाई करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कायद्याने काम करा, राजकारण्यांचे फोन घेऊ नका, हस्तक्षेप केला तर कारवाई करा

  राहुरी(वेबटीम)    राहुरी पोलीस ठाण्यात शासनाची नोकरी करताना कायद्याच्या कसोटीत राहुन काम करायचे. जमावबंदी व संचारबंदी काळात कोणाला सोडविण्...

 राहुरी(वेबटीम)

   राहुरी पोलीस ठाण्यात शासनाची नोकरी करताना कायद्याच्या कसोटीत राहुन काम करायचे. जमावबंदी व संचारबंदी काळात कोणाला सोडविण्यासाठी आमदार, खासदार व स्थानिक पुढाऱ्यांचा फोन आला तर फोन घेवू नका उलट कायदेशिर कारवाई करा मी तुमच्या पाठीशी उभा आहे कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी घाबरुन जायचे नाही. समोर येवून कोणत्याही पुढाऱ्यांने दमबाजी करण्याचा प्रयत्न केला तर रीतसर फिर्याद दाखल करावी असे स्पष्ट आदेश नव नियुक्त पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,राहुरी कारखाना येथील विठामाधव नाक्या जवळ जमावबंदी निमित्त विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरु असताना पेट्रोलिंग करीत असताना उपस्थित असलेल्या पोलीसांना समज वजा आदेश  पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिले. राहुरी पोलीस ठाण्याचा कारभार माझ्या हातात आहे तो पर्यत कायद्याने काम करा अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिल.कायद्याच्या चौकटी बाहेर काम कराल आणि अडचणीत सापडले तर मी कायद्यानेच कारवाई करणार.

            कायदेशिर कारवाई करताना कोणत्याही आमदार, खासदार व स्थानिक पुढाऱ्यांचा फोन आला तर फोन घेवू नका आणि समोरा समोर येवून पुढारी कोणी कायद्याने काम करण्यास अडचणी निर्माण करीत असेल त्या पुढाऱ्यावर कायदेशिर गुन्हा दाखल करा कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येवू दिली जाणार नाही.परंतू पुढाऱ्यांची हांजी हांजी बंद करा कोणता कर्मचारी तसे करताना दिसला तर त्या कर्मचाऱ्यावर किरवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी दिल्याने पोलीस कर्मचारी काञीत सापडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत