संगमनेर, श्रीरामपुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यां 178 जणांची चाचणी ; इतके निघाले बाधित..! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संगमनेर, श्रीरामपुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यां 178 जणांची चाचणी ; इतके निघाले बाधित..!

अहमदनगर : प्रतिनिधी  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विनाकारण फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर ...


अहमदनगर : प्रतिनिधी 


जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विनाकारण फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी केली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर आणि श्रीरामपुरात ही कारवाई करून 178 लोकांची तपासणी करण्यात येऊन 11 जण पॉझिटिव्ह आढळून आले

      संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. मा. जिल्हाधिकारी अहमदनगर  यांच्या आदेशाप्रमाणे रस्त्यावर विनाकारण फिरणारे  93 लोकांना ताब्यात घेऊन त्यांची रॅपिड टेस्ट केली, त्यापैकी  08 पॉझिटिव्ह आलेला असुन त्यास विलगीकरण कक्ष ठेवण्यात आलेले आहे.

कर्जतमध्ये नेमकं काय घडलं? वाचा अधिक... ग्रामीण भागात करोनाबद्दल ग्रामस्थांच्या मनातील भीती कायम आहे. त्यामुळे चाचणी करून घ्यायलाच ते घाबरतात. कर्जत तालुक्यातील वायसेवाडी गावात असा प्रकार घडला. आरोग्य पथक गावात अँटीजेन चाचणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, त्यांना पाहून गावकरी शेतावर कामाला निघून गेले. चाचणीसाठी कोणीच पुढे येईना. शेवटी गावातील माजी सैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपला लष्करी गणवेश चढविला आणि गावकऱ्यांकडे गेले. त्यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो ग्रामस्थ चाचणी करून घेण्यासाठी आले. सुदैवाने कोणीही पॉझिटीव्ह आढळून आले नाही.

श्रीरामपूर शहरात विनाकारण फिरणाऱ्या इसमांची  रॅपिड टेस्ट करण्यात आली, तसेच पॉझिटिव आढळलेल्या इसमांची रवानगी थेट CCC. येथे करण्यात आली आहे.

आज रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,  पो.नि.सानप, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार  व नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांचे सह छत्रपती शिवाजी चौक येथे अचानक नाकाबंदी लावून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याचे  वाहनावर कारवाई करून जप्त केले  तसेच 85 इसमांची रॅपिड टेस्ट केली .त्यापैकी 2 पॉझिटिव्ह आढळून  आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या   इसमांची रवानगी  थेट कोविड केअर सेंटर येथे करण्यात आली आहे.अचानक झालेल्या या कारवाईमुळे काही वेळातच श्रीरामपूर शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे पहायला मिळाले. ही कारवाई अन्य तालुक्यातही सुरु असल्याने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्याचे पहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत