मुंबईच्या उद्योजकाकडून सुगाव कोविड सेंटरला 4 लाख रुपयांची औषधे भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुंबईच्या उद्योजकाकडून सुगाव कोविड सेंटरला 4 लाख रुपयांची औषधे भेट

अकोले :; प्रतिनिधी  सुगाव कोविड सेंटरला वैद्यकीय उपकरणे व औषधे यांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.मुंबई येथील गुलाबदास अँड कंपनी चे माजी कार्यक...


अकोले :; प्रतिनिधी 


सुगाव कोविड सेंटरला वैद्यकीय उपकरणे व औषधे यांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.मुंबई येथील गुलाबदास अँड कंपनी चे माजी कार्यकारी संचालक,उद्योजक संजय भगत यांनी  सुगाव कोविड सेंटर ला 4 लाख रुपयांची औषधे दिली आहेत. देव फार्मा कंपनी चे प्रतिनिधी यांनी  भगत यांच्या आर्थिक सहकार्यांने दिलेली  ही औषध रुपी मदत सुगाव कोविड सेंटर चे नोडल अधिकारी डॉ अभिनय लहामटे यांचे कडे  काल सुपूर्द करण्यात आली.यावेळी डॉ टाळे,शिंदे सिस्टर आदी उपस्थित होते.


सुगाव कोविड सेंटर  सुरू झाल्या नंतर  देव फार्मा कंपनी कडून दोन हजार  मास्क खरेदी केले होते.त्यावेळी संबंधित कंपनी कडे आदिवासी नभागातील कोविड रुग्णांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती.त्यानुसार संजय भगत यांच्या  सौजन्याने ही 4 लाखांची औषधे घेऊन देव फार्मा चे आशिष दुर्गे व त्यांचे सहकारी सुगाव ला आले होते.त्यात औषधे, सॅनीटायझर,ड्रम, ग्लोज आदी साहित्य यांचा समावेश आहे.  विशेष म्हणजे पुढील काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना उपयुक्त ठरतील अशा औषधांचा यात समावेश आहे.


प्रेम -स्नेहा पारिवाराच्या प्रमुख उत्कर्षाताई रुपवते यांनीही सुगाव कोविड सेंटर ला पल्स ऑक्सीमीटर व थर्मल गन भेट दिली आहेत.यापूर्वी याच कोविड सेंटर ला 50 गादया त्यांनी दिल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत