कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात ग्रामस्थ यशस्वी ; चिंचबन पॅटर्नची राज्यात चर्चा ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यात ग्रामस्थ यशस्वी ; चिंचबन पॅटर्नची राज्यात चर्चा !

    नेवासा :   प्रतिनिधी     नेवासा तालुक्यातील बहुसंख्य गावांसह नेवासा शहरही कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असतांना नेवासा शहरांपासून अवघ...

   


नेवासा :   प्रतिनिधी    


नेवासा तालुक्यातील बहुसंख्य गावांसह नेवासा शहरही कोरोनाच्या विळख्यात सापडलेले असतांना नेवासा शहरांपासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असणा-या चिंचबन गावात मात्र आजपर्यंत एकही कोरोना रुग्ण नाही. ग्रामस्थांनी नियमांचे पालन करुन कोरोनाचा संसर्ग गावात होऊ दिला नाही. चिंचबन ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी राबवणे ही काळाची गरज बनली आहे.


गावात बाहेरुन येणा-या व्यक्तीला गावबंदी, विलगीकरण, सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी, गावातील भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून गावातच विक्री, दुस-या गावांतून येणा-या भाजीपाला व किराणामाल विक्रेत्यांना मनाई आदी उपाययोजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकजूटीतून कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही.


गावची लोकसंख्या ७५० ते ८०० असून गावात मुख्यत्वे शेतकरी, शेतमजूर, दलित व आदिवासी कुटुंबे आहेत. शेतकरी प्रामुख्याने ऊस, गहू, केळी इ. पिके घेतात. बारमाही बागायती शेती असल्याने गांव सधन आहे. बहुतांशी शेतकरी वर्ग स्वत:च्या शेतातच घरे बांधून राहत आहेत. गावांत सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना असून बहुतांशी ग्रामस्थांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग व प्रसार होत नाही. ग्रामस्थांनी वज्रमूठ करुन तालुक्याचे ठिकाणी जायचे नाही असा निर्धार केला आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत व अपरिहार्य कारणास्तव नेवासा येथे जाणे आवश्यक झाल्यास जातांना सक्तीने मास्क परिधान करण्यासह सोशल डिस्टंन्सींगचेही पालन केले जात आहे. आठवडे बाजार पूर्णत: बंद करण्यात आलेला आहे. शासनाच्या कोरोनाविरोधी अभियानांतर्गत गावांत जनजागरण मोहिम सातत्याने राबविली जात आहे. ग्रामस्थांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे, त्यावरील उपाययोजना व आजाराचे गांभिर्य याबाबत जागृती निर्माण करण्यात येत असून मोहिमेस चांगले यश आले आहे. ग्रामस्थांचा या मोहिमेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 


चिंचबन गांव तालुक्यापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असून छोटे गांव आहे. गावांत आरोग्य केंद्र नाही. लसीकरण कार्यक्रमांची मात्र आजपर्यंतही सुविधा उपलब्ध्‍ा झालेली नाही. लसीचा तालुका  आरोग्य केंद्रात तुटवडा असल्याने बहूसंख्य  ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत.

     गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी गावातले युवा वर्ग प्रामुख्याने पुढाकार घेत आहे. चिंचबन मिञमंडळाचे सदस्य भाऊसाहेब शिंदे, सुनिल चव्हाण, अजित चव्हाण, राहुल डौले, अशोक थिटे, संजय जाधव, अरुण जाधव, संजय शिंदे, शंकर माळी यांसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे प्रमुख दत्ताञय मापारी, ग्रामपंचायत कर्मचारी व आशा आरोग्यसेविका यांचे याकामी सहकार्य मिळत असून गांव सतत कोरोनामुक्त ठेवण्याचा पक्का निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.


        


गावनिहाय लसीकरण कार्यक्रम राबविणेबाबत आम्ही लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे शेतमजूर व कष्टकरी जनतेस रोजगार बुडवून तालुक्याचे ठिकाणी लसीकरणांसाठी जावे लागणार नाही. ग्रामस्थांना गावांतच लसीकरण सुविधा उपलब्ध झाल्यास अधिक सुलभ होईल. 

               विठ्ठलराव शिंदे 

          सरपंच, चिंचबन ता.नेवासा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत