WhatsApp चे नवीन फीचर येतेय ; वाचा काय आहे विशेष - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

WhatsApp चे नवीन फीचर येतेय ; वाचा काय आहे विशेष

नवी दिल्लीः  वेबटीम    मेसेजिंग व्हॉट्सअप अनेक दिवसांपासून व्हॉइस मेसेजच्या प्ले बॅक स्पीडवर काम करीत आहे. या फीचर अंतर्गत युजर्स कोणत्याही...



नवी दिल्लीः  वेबटीम 


  मेसेजिंग व्हॉट्सअप अनेक दिवसांपासून व्हॉइस मेसेजच्या प्ले बॅक स्पीडवर काम करीत आहे. या फीचर अंतर्गत युजर्स कोणत्याही व्हॉइस मेसेजला वेगाने किंवा हळू स्पीडने ऐकू शकेल. सध्या हे फीचर टेस्टिंगच्या फेज मध्ये आहे. आता एका ताज्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअप मेसेज संबंधी आणखी एक फीचर टेस्टिंग करीत आहे. या फीचर अंतर्गत कोणताही व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी रिव्ह्यू केले जाऊ शकेल.

काय आहे नवीन फिचर

सध्या तुम्हाला व्हॉट्सअपवर कोणताही मेसेज पाठवायचा असेल तर माइक बटनला दाबून आवाज रेकॉर्ड करावी लागते. बटनला सोडल्यानंतर व्हॉइस मेसेज ऑटोमेटिकली जातो. परंतु, नवीन फीचरच्या आल्यानंतर युजर्संना आपला मेसेज पाठवण्याआधी ऐकण्याची सुविधा मिळते. सध्या युजर्संला मेसेज थेट सेंड करावा लागतो. रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हॉट्सअप आपल्या अपमध्ये एक रिव्ह्यू बटन जोडणार आहे. यावर टॅप केल्यानंतर व्हॉइस मेसेज ऐकता येऊ शकतो. यानंतर युजर मेसेज ऐकू शकतात की, पाठवायचा की नाही.

 फोटो आणि व्हिडिओची साईज वाढणार

व्हॉट्सअपने नुकतेच आपल्या युजर्संसाठी आणखी एक नवीन फीचर जारी केले आहे. नवीन फीचरद्वारे आता व्हॉट्सअप चॅट मध्ये फोटो आणि व्हिडिओ आधीच्या तुलनेत जास्त मोठे दिसणार आहे. आधी व्हॉट्सअॅप वर ज्यावेळी फोटो पाठवली जाते. त्यावेळी त्याचा प्रीव्ह्यू स्कॉयर शेपमध्ये दाखवली जात होती. म्हणजे फोटो लांब असेल तर ती प्रीव्ह्यू मध्ये कट होत होती. आता तुम्ही फोटो न ओपन करता पूर्णपणे पाहू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत