वळण/प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील पुर्व भागात मानोरी ग्रामपंचायतीच्या वतीन ग्राम निधीतून दिव्यांग व्यक्तींना किराणा मालाचे व...
वळण/प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील पुर्व भागात मानोरी ग्रामपंचायतीच्या वतीन ग्राम निधीतून दिव्यांग व्यक्तींना किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.येथील ग्रामपंचायत ग्रामनिधीतून पाच टक्के रकमेतुन गावातील चाळीस दिव्यांग व्यक्तींना ह्या किराणा समान वाटप करण्यात आले.सध्या सर्वञ लाॅकडाऊन सुरू असल्याने अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना अनेक गोष्टींचा सामाना करावा लागतो.त्यामुळे येथील दिव्यांग व्यक्तींना किराना सामान वाटप करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह्या सामानाचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी सरपंच आब्बासभाई शेख, उपसरपंच बापुसाहेब देवकाते, शामराव आढाव ,दिलावर पठाण,अण्णासाहेब तोडमल, मनोज आढाव, उत्तमराव आढाव, निवृत्ती आढाव ,पिरखाभाई पठाण, नवनाथ थोरात, वसंत आढाव, सुनील पोटे,गोकुळदास आढाव,बाबासाहेब आढाव, संजय पिले, शब्बीर पठाण, ग्रामविकास अधिकारी मुरलीधर रगड,ग्रामपंचायत कर्मचारी गोरक्षनाथ गुंड आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत