राहुरी (वेबटीम) :- राहुरी तालुक्यातील कनगर शिवारात वादळी वाऱ्याने अनेक घराचे पत्रे, भिंती कोसळून मोठे नुकसान झाले होते.त्या नुकसानग्रस्त क...
राहुरी (वेबटीम) :-
राहुरी तालुक्यातील कनगर शिवारात वादळी वाऱ्याने अनेक घराचे पत्रे, भिंती कोसळून मोठे नुकसान झाले होते.त्या नुकसानग्रस्त कुटूंबियांच्या मदतीसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आर्थीक मदतीचा हात दिला आहे.
मंगळवारी राञी नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य भास्कर गाढे, सुयोग नालकर ,अनिल घाडगे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव ,नरेंद्र शिंदे ,जीवन गुलदगड, नामदार प्राजक्त दादा यांचे स्वीय सहाय्यक विजय टापरे यांनी नुकसान ग्रस्त कुटूंबियांची भेट घेऊन हा मदत निधी सदर कुटूंबियांना सुपूर्द केला आहे.राज्यमंत्री तनपुरे हे कामानिमित्त मुंबई येथे असल्याने त्यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्ते यांनी पाठवुन हि मदत दिली आहे.तर शासन स्थरावर देखील त्यांना मदत मिळवुन दिली जाईल अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली आहे.यावेळी मंगल किसन गाढे,गणपत भिका घाडगे,गेणु एकनाथ घाडगे, सचिन नालकर ,रघुनाथ घाडगे,गोरक्षनाथ वरघुडे , रमेश गाढे,अर्जुन जाधव,अशोक जाधव, भिमराज जाधव आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत