देवळाली प्रवरा प्रतिनिधी कायम सामाजिक प्रश्नाची जान असणारे, समाजावर कुठलेही संकट उभे राहिले तर पुढे जाऊन नेतृत्व करणारे नगरसेवक अदिनाथ...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
कायम सामाजिक प्रश्नाची जान असणारे, समाजावर कुठलेही संकट उभे राहिले तर पुढे जाऊन नेतृत्व करणारे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. देवळाली प्रवरा नगर पालिकेचे भावी नगराध्यक्ष म्हणून कराळे यांच्या कडे पाहिले जात आहे. आगामी निवडणूकीपुर्वीच ना.प्राजक्त तनपुरे यांनी सुतोवाचन करुन नगरसेवक कराळे यांना पाठबळ देण्यास सुरवात केली आहे. ना.तनपुरे यांचे पाठबळ मिळाल्यास देवळाली प्रवरा नगर पालिकेत सत्तांतर होण्यास मदत होईल असे बोलले जात आहे.
राहुरी फँक्टरी येथे नगरसेवक अदिनाथ कराळे यांनी स्वमालकीच्या इमारतीत 20 बेडचे आँक्सीजन सुविधेसह कोविड सेंटरच्या शुभारंभा प्रसंगी ना.तनपुरे यांनी नगरसेवक अदिनाथ कराळे देवळाली प्रवरा नगर पालिकेचे भावी नगराध्यक्ष असल्याचा पञकारांदेखत उल्लेख केल्याने आगामी निवडणूकीत कराळे हे राष्ट्रावादीचे उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. कराळे सध्या हे भाजपाचे नगरसेवक आहेत. मध्यंतरीच्या नाराजीमुळे कराळे यांचा कल ना.तनपुरे यांच्याकडे वाढला आहे. ना.तनपुरे यांनीही नगरसेवक कराळे यांना पाठबळ देण्यास सुरवात केली आहे.सध्यातरी ना.तनपुरे यांच्या कडे नगरसेवक कराळे यांच्या शब्दाला वजन आहे.ना.तनपुरे यांना सांगितलेली कामे झटपट होत आहे.
नगरसेवक कराळे यांनी शिवबा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक सेवाभावी कार्यक्रम राबविले आहे. प्रत्येक कार्यक्रमास ना.तनपुरे जातीने उपस्थित राहुन कराळे यांना पाठबळ देत आहे. नगरसेवक कराळे सध्या ज्या पक्षात आहे.त्या पक्षाच्या नेत्यांनाही ते प्रत्येक कार्यक्रमास आमंञित करतात परंतू अनेकवेळा त्यांची अनउपस्थिती जाणवली आहे.माञ ना.तनपुरे माञ छोट्याशी कार्यक्रमास उपस्थित राहुन नगरसेवक कराळे यांचे मनोधर्य वाढविण्यासाठी पाठबळ देत आहे. देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या आगामी निवडणूकीत राष्ट्रावादी पुर्ण ताकदीनिशी उतणार असल्याचे संकेत ना.तनपुरे यांच्या बोलण्यातून जाणवते.त्याच बरोबर नगर पालिकेचे 18 उमेदवारांपैकी एक उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी ना.तनपुरे यांनी नाव निश्चित करुन ठेवले आहे. ना.तनपुरे यांच्या पाठबळामुळे नगर पालिकेतील सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवक आता पासुनच संपर्कात आहेत.त्यामुळे भाजपाला मोठे खिंडार पडणार हे निश्चित आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत