श्रीरामपूर(वेबटीम) छावा संघटनेने अधिक्षक अभियंत्यांना घेरावो आंदोलनाचा इशारा देताच अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याच्या कामातील उर्वरीत २०० मिटर क...
श्रीरामपूर(वेबटीम)
छावा संघटनेने अधिक्षक अभियंत्यांना घेरावो आंदोलनाचा इशारा देताच अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याच्या कामातील उर्वरीत २०० मिटर कामास आता सुरूवात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या अंदाजपत्रकातील हस्तक्षेप जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी उघडकीस आणल्यानंतर अभियंत्यांनी तातडीने हे पाऊल उचलले.
तालुक्यातील कारेगाव- खोकर-भेर्डापूर एमडीआर १४ या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मूळ अंदाजपत्रकात हे काम १००० मीटर आहे. मात्र ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे काम अवघे ८०० मिटर करण्याचा घाट घातला होता. अंदाजपत्रात हस्तक्षेपही करण्यात आला होता. याबाबत छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकीस आणली. शिवाय हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचेही त्यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय रस्ता मूळ नकाशा प्रमाणे न घेता १ ते २ फूट पश्चिमेला ओढ्याच्या बाजूला रसकला गेल्याने ओढ्याच्या बाजूला ईडपट्टी ला जागा शिल्लक नाही पावसाळ्यात रस्ता वाहून जाण्याची भीती आहे ह्याची प्रत्यक्ष पाहणी करावी. नियम ध्याब्यावर बसून काम चालू करताना माहिती फलक न लावता विहरिवरील कच्ची खडी 50 ते 55 ब्रास टाकून काम उरकणाऱ्या अभियनता दत्तात्रय कुलकर्णी यांनी खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा इतर मागण्याही करण्यात आल्या होत्या. मागण्या मान्य न झाल्यास अधिक्षक अभियंत्यांना घेरावो घालण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
याची दखल घेत तातडीने काम पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता उर्वरीत कामास प्रारंभ झाला असल्याचे नितीन पटारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आमदार कानडेंची दुटप्पी भुमिका
याप्रश्नाबाबत छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी संगमनेर येथील .विभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालयात लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी आमदार लहू कानडे यांनी मध्यस्ती करीत अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडू अशी भुमिका घेतली होती. मात्र त्यांनी दि २६ मे रोजी अचानकपणे येऊन या रस्ता कामाचे भुमिपूजन केले. येथे शासकीय निमांची पायमल्ली होत असताना अधिकारी व ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम आमदार कानडे करीत आहेत. त्यांची ही भुमिका दुटप्पी असल्याचा आरोप नितीन पटारे यांनी केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत