शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी ; शेतकऱ्यांची मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी ; शेतकऱ्यांची मागणी

  गोविंद फुणगे/राहुरी        राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या खरबूज टरबूज कांदा टोमॅटो पिकाची मोठी शेती आहे मात्र सध्या सर्वत्...

 


गोविंद फुणगे/राहुरी 


     राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये सध्या खरबूज टरबूज कांदा टोमॅटो पिकाची मोठी शेती आहे मात्र सध्या सर्वत्र लोक डाऊन असल्याने बाजारपेठा बंद झाले आहेत त्यामुळे हा शेतीमाल विकायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे त्यामुळे  लॉकडाऊन काळात देखील शेतीमालाला शासनाने बाजारपेठ निर्माण करून द्यावी अशी  मागणी टरबूज,खरबुज, टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधुन केली जात आहे.


    कोरोना महामारीने  महाराष्ट्रभर संचारबंदी सुरू आहे,बाजार समित्या बंद असल्याने बाजारपेठा बंद झाल्यात..त्यामुळे आता माञ ऐन काढलीला आलेल्या शेती माल विकायचा कसा अशी पेच शेतक-यांपुढे निर्मान झाला आहे.आरडगाव येथील शेतकरी दत्ताञय शेळके यांनी आपल्या एक एकर मधे टरबूज शेती केली त्यात अंतरपिक म्हणून टोमॅटो पिक घेतले  मोठ्या मेहतीने पीक जोमाने आनले.बीयाने, औषध फवारणी ,खते आदींसह उत्तम व्यवस्थापण करून पिक आनले ,पिक देखील काढणीला आलय माञ सर्वञ लाॅकडाऊन असल्याने या पिकाची विक्री करायची कोठे असा मोठा पेचप्रसंग समोर निर्माण झालाय त्यामुळे या लोक डॉन काळामध्ये शेतकऱ्यांना बाजारपेठ निर्माण करून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांमधुन केली जात आहे.

मी आरडगाव येथील माझ्या शेतामध्ये एक एकर टरबूज शेती केली त्यात आंतरपीक म्हणून टोमॅटोचे पीक देखील घेतले लॉकडाउन काळातदेखील शेती उपयोगी असणारे बरेच साहित्य हे चढ्या भावाने हे ठिकठिकाहुन उपलब्ध केले सुमारे दीड लाख रुपये इतका खर्च या पिकाला झाला आहे. दोन्ही पिके हे उत्तम रित्या आले आहेत, आठ दिवसांमध्ये टरबूज काढणीला येईल आणि टोमॅटो देखील विक्रीला येईल मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात निघालेला हा माल विकायचा कसा हाच मोठा प्रश्न समोर आहे.त्यामुळे आधीच कर्ज काढून केलेली शेती आणखीनच कर्जाच्या खाईत लोटतीय काय अशी मोठी भीती मनामध्ये निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी देखील याच काळात लाॅकडाऊन असल्याने पिकांचे मोठे नुकसान झालं होते आणि आताही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने आता शेतक-यांच्या भावना विचारत घेता या काळातही उत्तम बाजारपेठ निर्माण करून द्यावी; दत्ताञय शेळके, आरडगाव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत