कोरोना योद्ध्यांचे प्राधान्याने लसीकरण करा : वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना योद्ध्यांचे प्राधान्याने लसीकरण करा : वहाडणे

कोपरगाव (वेबटीम):- गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, समाजसेवक, पत्रकार, नगरसेवक व कार्यकर्ते ज...

कोपरगाव (वेबटीम):-

गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय यंत्रणेबरोबर स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, समाजसेवक, पत्रकार, नगरसेवक व कार्यकर्ते जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यामुळे या कोरोना योद्ध्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे.

सदर निवेदनात वहाडणे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्यासह स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, समाजसेवक, पत्रकार, नगरसेवक व कार्यकर्तेही कोरोना योद्धे म्हणून आपापल्या परीने कोरोनाशी लढा देत आहेत. हे काम करताना कोविडचा धोका संभवतो म्हणून या कोरोना योद्ध्यांचे प्राधान्याने लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच शहरात कोरोना वॉर रुमच्या माध्यमातून सेवा देणारे युवक यांचेही लसीकरण करावे, अशी मागणी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत