महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोरोना काळातील उपक्रमांचे ना.थोरात यांनी केले कौतुक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कोरोना काळातील उपक्रमांचे ना.थोरात यांनी केले कौतुक

कोपरगाव प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव तालुका शाखेच्यावतीने नुकताच रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमास...

कोपरगाव प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव तालुका शाखेच्यावतीने नुकताच रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना रक्तदानाची नितांत गरज असताना या काळात हा उपक्रम राबून बहुतांशी रुग्णांची रक्ताची ची गरज या उपक्रमातून भागविण्यात आली. अर्थात रक्तदान हे जीवनदान असल्याने या उपक्रमाचे केवळ कोपरगावकरांनी नव्हे तर राज्य पातळीवर अनेक दिग्गजांनी तोंड भरून कौतुक केले अनेकांनी या रक्तदान शिबिरासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत देखील केली करोना महामारीचे संकट लक्षात घेऊन अनेक रक्तदात्यांनी पत्रकार संघाच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतः येऊन रक्तदान केले. या सर्वांचे ऋण तर व्यक्त केलेच पाहिजे परंतु ऋणातून उतराई होऊन सगळ्यांनाच नजरेआड करणे म्हणजे प्रतारणा केल्यासारखे होईल म्हणून ऋण आतील राहण्यातच आम्हाला आनंद वाटतो.

राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात पाटील यांचाही आम्हाला एक शुभ संदेश प्राप्त झाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव तालुका शाखेच्या वतीने नुकताच रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला असल्याची बातमी समजली आनंद वाटला अशा शब्दात नामदार बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले ते पुढे असेही म्हणतात पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून आपण पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले आहे यांच्याबरोबर सातत्याने सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रमांचे आयोजन करून सामाजिक मूल्य आपण जपत आलेला आहात.

कोरोना महामारीच्या संकटातून समाजातील प्रत्येक जण वाटचाल करीत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आतील सर्व पत्रकार बांधव पदाधिकारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहात विशेषतः कोरोना रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आपण सर्वांनी रक्तदान सारखा अभिनव उपक्रम राबवून समाजासमोर जो आदर्श निर्माण केला तो कौतुकास्पद तर आहेच पण इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.

आपल्या या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करून आपल्या पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतितो आपल्या पत्रकार संघामार्फत भविष्यातही असेच विधायक स्वरूपाचे उपक्रम राबविले जावेत त्यासाठी परमेश्वर आपणा सर्वांना शक्ती देवो अशी विनम्र प्रार्थना करतो. अशा शब्दात नामदार बाळासाहेब थोरात पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधव पदाधिकारी यांची कामांची प्रशंसा केली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने रक्तदानाचे उपक्रम तर राबविला पण त्याचबरोबर आता कोरोना महामारीत निधन पावलेल्यांच्या कुटुंबांना हातभार लावण्याच्या दृष्टीने अंत्यसंस्कारासाठी लगणारे साहित्य जमा केले. अजुनही साहित्य जमा करण्याचे उपक्रम सुरुच आहे. अनेक दानशुर व्यक्तींनी पुढे येत उपक्रमास वस्तुरुपात व आर्थिक स्वरुपात मदत करुन सामाजिक दायित्व सिध्द केले आहे. या सर्वांनाही मनापासुन आम्ही धन्यवाद देत असुन सर्वांच्या ऋणात राहण्यास धन्यता मानीत आहोत. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष मनिष जाधव, उपअध्यक्ष जनार्दन जगताप, शहराध्यक्ष

हाफीज शेख, उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे, तालुका सचिव विनोद जवरे, विजय कापसे तालुका सह.सचिव, तालुका संघटक मधुकर वक्ते, तालुक सह. संघटक फकिरा टेके, अक्षय काळे, सोमनाथ डफाळ, अमोल गायकवाड, समाधान भुजाडे, योगेश गायके, राहुल कोळगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत