भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची कोल्हेंवर प्रश्नांची सरबत्ती करुन टीका - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची कोल्हेंवर प्रश्नांची सरबत्ती करुन टीका

कोपरगाव/वेबटीम :- कोविडच्या संकटात चांगले काम केल्याबद्दल भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे...

कोपरगाव/वेबटीम :-


कोविडच्या संकटात चांगले काम केल्याबद्दल भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा सत्कार केला. याबद्दल कोल्हे परिवाराचे पित्त खळवळले असून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांविरुद्ध पत्रकबाजी करुन सत्काराशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोल्हेंवर विविध प्रश्नांची सरबत्ती करुन टीका केली आहे.

कोविडच्या संकटात प्रशासनाबरोबर लोकप्रतिनिधी देखील रात्रं-दिवस लढा देत आहे. याची दखल घेऊन भाजपचे जुने कार्यकर्ते विनायक गायकवाड, योगेश वाणी, चेतन खुबानी, किरण वडनेरे, संजय कांबळे, मनोहर कृष्णानी, पी.एम.पाटील यांनी आमदार काळे, नगराध्यक्ष वहाडणे आणि मुख्याधिकारी सरोदे यांचा सत्कार केला. याचा कोल्हे परिवाराने तिरस्कार केला आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करताना जुने कार्यकर्ते म्हणाले, आमदार काळे हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी ते तालुक्याचे म्हणजे सर्वांचेच आमदार आहेत. आम्ही तुमचाही सत्कार केला असता; पण तुम्हाला आमच्याकडून झालेला सत्कार चालणार नाही हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही भाजप पदाधिकारी सुनील वाणी यांना हाताशी धरुन जुन्या भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध पत्रक काढून सत्कार करणार्‍यांचा भाजपशी काहीच संबंध नसल्याचे नमूद केले आहे. केवळ पदाच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये आलेल्यांनी जुन्या कार्यकर्त्यांबद्दल बोलू नये. कोल्हेंना काळेंबद्दल इतका द्वेष असताना त्यांनी जिल्हा बँकेचे संचालकपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याशी का जुळवून घेतले? तुम्ही अजूनही खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात राहिलेले कसे चालते? हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार्‍या खासदार शरद पवार यांच्याविरुद्ध बोलून दाखवा. धमक असेल तर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आमदार काळे यांना विरोध करूनच दाखवा. भाजपचे खरे निष्ठावान कोण हे जनतेला माहीत आहे. तुम्ही भाजपच्या प्रदेश पदाधिकारी आहात, तुम्ही जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर कारवाई करा. परंतु तालुक्यात व शहरातील विकासकामे करायची सोडून द्वेषाचे राजकारण करू नका. विशेष म्हणजे तुम्ही अजून किती दिवस भाजपात राहणार हे देखील आधी जाहीर करा असे आव्हानच कार्यकर्त्यांनी दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत