कर्जत येथे महिला पेशंटच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या पुढाकारातून कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्जत येथे महिला पेशंटच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या पुढाकारातून कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

    कर्जत प्रतिनिधी -: गेले दीड वर्षापासून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लोकांना होत असून पुरुष तसेच महिला रुग्ण हे कोव्हिड केअर सेंटर मध्ये...

    कर्जत प्रतिनिधी-:


गेले दीड वर्षापासून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव लोकांना होत असून पुरुष तसेच महिला रुग्ण हे कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार कामे दाखल असतात. काही जिल्ह्यातील सेंटरमध्ये महिला रुग्णांना त्रास झाल्याची उदाहरणे आहेत. कर्जत पोलिस हे नेहमीच महिलांच्या सुरक्षेसंदर्भात उपाय योजना करण्यासाठी तत्पर असतात. त्याच धर्तीवर कोविड केअर सेंटर गायकरवाडी, तालुका कर्जत तसेच उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील कोव्हीड केअर सेंटर अशा दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवने सुरू आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळणार आहे, सुरक्षित वाटणार आहे. सरकारच्या सुद्धा त्याबाबत आहेत मार्गदर्शक सूचना आहेत. 


सदरचे सी सी टी व्ही कॅमेरे हे श्री शरद मुळे यांचे सिद्धांत एंटरप्रायसेस यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहनवरून जोपर्यंत कोविड केअर सेंटर आहे तोपर्यंत ठेवणार असे लावले आहेत.


तसेच सदर परिसरात पोलीस स्टेशन चे अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. जेणेकरून महिलांना काही तक्रार असल्यास तात्काळ त्यांना कर्जत पोलिसांची संपर्क करता येईल. गायकवाडी येथे महिला रुग्ण ऍडमिट असलेल्या इमारतीत 5 व उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे कोव्हीड केअर सेंटर मध्ये 7 कॅमेरे लावणे सुरू आहे.


सदरची कारवाई-

श्री मनोज पाटील, पोलीस अधीक्षक अहमदनगर,

श्री सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर,

श्री आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत


यांचे मार्गदर्शनाखाली 

चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन, पोलीस जवान मनोज लातूरकर, अमित बर्डे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत