आंबी (वेबटीम) :- उक्कलगावमध्ये फुलहार, माळा देवून केसापूरकडे घरी परतत असताना केसापूर येथील प्रवरा नदीवरील के. टी. वेअर बंधाऱ्याच्या कठड्या...
आंबी (वेबटीम) :-
उक्कलगावमध्ये फुलहार, माळा देवून केसापूरकडे घरी परतत असताना केसापूर येथील प्रवरा नदीवरील के. टी. वेअर बंधाऱ्याच्या कठड्याचा अंदाज न आल्याने गणेश मोहन भगत (रा. केसापूर राहूरी) हे अंदाज न आल्याने तोल जाऊन बंधाऱ्यात पडले. दैव बलत्तर म्हणून भगत हे थोडक्यात बचावले.
राहुरी व श्रीरामपूर तालुक्याच्या मध्यावर असलेल्या प्रवरानदी वरील केसापूर के.टी. वेअर बंधाऱ्याला कठडे नसल्याने अपघात घडत आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या बंधाऱ्याला संरक्षक कठडे बसविण्याची वेळीवेळी मागणी केली असताना अद्यापही संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाही. राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा हा मध्यवर्ती के.टी. वेअर बंधारा आहे. केसापूर, आंबी, दवणगाव, बेलापूर, केशव गोविंद बन देवस्थान, राहूरीकडे जाणाऱ्यांसाठी हा जवळाचा रस्ता आहे. या बंधाऱ्याचा प्रवासी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक रस्त्याचा वापर करतात. या बंधाऱ्यावरुन नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत केसापूर बंधाऱ्याचा वापर जीवघेणा ठरत आहे.
संबंधीत विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अअन्यथा आणखी एखादा अपघात झाल्यास यास जबाबदार राहणार कोण? असा सवाल प्रवासी वर्ग व पंचक्रोशीतील नागरिकांमधून विचारला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत