देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे) म्युकोरमायकोसिसचा राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरात पहिला रुग्ण आढळला असून गुरुवारी सायंकाळी त्याचा उपचा...
देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे)
म्युकोरमायकोसिसचा राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरात पहिला रुग्ण आढळला असून गुरुवारी सायंकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तर आणखी दुसरा एक रुग्ण सापडला असुन त्याच्यावर राहाता येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शस्ञक्रीया करण्यात आली आहे.
देवळाली प्रवरात कोरोना पाठोपाठ म्युकोरमायकोसिसचे आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरमायकोसिस आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे.देवळाली प्रवरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. कोरानावर उपचार घेतल्या नंतर तो पुर्ण पणे बरा झाला होता. दोन दिवसा पुर्वी म्युकोरमायकोसिसचे लक्षण त्या रुग्णास दिसू लागले होते.त्यावर उपचार घेण्यासाठी त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार चालू असताना गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. देवळाली प्रवरात म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तर दुसरा रुग्ण ३० वर्षीय तरुणास असुन त्याच्यावर राहता येथील खासगी हाँस्पीटल मध्ये उपचार सुरु आहे.त्याच्यावर यशस्वी शस्ञक्रिया करण्यात आली आहे.उपचारा नंतर त्यांची पुन्हा प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे.त्यानंतर तो तरुण पुर्णपणे बरा झाला की नाही समजार आहे .52 वर्षीय व्यक्तीस म्युकोरमायकोसिसच्या आजारा बाबत मुख्याधिकारी अजित निकत यांनी दुजोरा दिला आहे.तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ए.बी.मासाळ यांनी माञ आमच्याकडे या रुग्णा बाबत कोणतीच माहिती नाही.देवळाली प्रवराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात "आंधळ दळतय अन् कुञ पिठ खातय" अशी अवस्था आहे.या आरोग्य केंद्रात देवळाली प्रवरातील रुग्णां विषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसते. म्युकोरमायकोसिस या आजाराबाबतची माहिती अद्यापही शासनाकडून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे असे किती रुग्ण देवळाली प्रवरात असतील याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रात हम करोसा कायदा सुरु असुन येथील वैद्यकिय आधिकाऱ्यास कोणतीही माहिती विचारली तरी माझ्याकडे नाही. शासनाला विचारा असे उत्तर देत असल्याने या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिक तक्रारीचा पाढा वाचत आहे.
म्युकोरमायकोसिसचा राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरात पहिला रुग्ण आढळला असून गुरुवारी सायंकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तर आणखी दुसरा एक रुग्ण सापडला असुन त्याच्यावर राहता येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शस्ञक्रीया करण्यात आली आहे.
देवळाली प्रवरात कोरोना पाठोपाठ म्युकोरमायकोसिसचे आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरमायकोसिस आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे.देवळाली प्रवरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. कोरानावर उपचार घेतल्या नंतर तो पुर्ण पणे बरा झाला होता. दोन दिवसा पुर्वी म्युकोरमायकोसिसचे लक्षण त्या रुग्णास दिसू लागले होते.त्यावर उपचार घेण्यासाठी त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार चालू असताना गुरुवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. देवळाली प्रवरात म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
तर दुसरा रुग्ण ३० वर्षीय तरुणास असुन त्याच्यावर राहता येथील खासगी हाँस्पीटल मध्ये उपचार सुरु आहे.त्याच्यावर यशस्वी शस्ञक्रिया करण्यात आली आहे.उपचारा नंतर त्यांची पुन्हा प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे.त्यानंतर तो तरुण पुर्णपणे बरा झाला की नाही समजार आहे .52 वर्षीय व्यक्तीस म्युकोरमायकोसिसच्या आजारा बाबत मुख्याधिकारी अजित निकत यांनी दुजोरा दिला आहे.तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ए.बी.मासाळ यांनी माञ आमच्याकडे या रुग्णा बाबत कोणतीच माहिती नाही.देवळाली प्रवराच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात "आंधळ दळतय अन् कुञ पिठ खातय" अशी अवस्था आहे.या आरोग्य केंद्रात देवळाली प्रवरातील रुग्णां विषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसते. म्युकोरमायकोसिस या आजाराबाबतची माहिती अद्यापही शासनाकडून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे असे किती रुग्ण देवळाली प्रवरात असतील याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रात हम करोसा कायदा सुरु असुन येथील वैद्यकिय आधिकाऱ्यास कोणतीही माहिती विचारली तरी माझ्याकडे नाही. शासनाला विचारा असे उत्तर देत असल्याने या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिक तक्रारीचा पाढा वाचत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत