मंत्री गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंत्री गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ झाडांचे वृक्षारोपण करून वाढदिवस केला साजरा.

    नेवासा(वेबटीम):-  राज्याचे सहकार महर्षी जेष्ठ साहित्यीक माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या वृक्षसंवर्धन प्रेरणेतुन जलसंधारण मंत्री ...

   नेवासा(वेबटीम):- 

राज्याचे सहकार महर्षी जेष्ठ साहित्यीक माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्या वृक्षसंवर्धन प्रेरणेतुन जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा ५१वा वाढदिवस पानेगाव येथील क वर्ग  महादेव देवस्थान ट्रस्ट च्या परीसरात ५१ झाडांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी मुळाचे संचालक तसेच लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, मुळाचे संचालक रंगाभाऊ जंगले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष,तथा उपसरपंच रामभाऊ जंगले महादेव देवस्थान ट्रस्टचे सचिव किशोर जंगले, ज्ञानदेव जंगले, गुलाब गायकवाड, विशाल जंगले,बाबाराजे गुडधे आदी सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय जंगले यांनी नामदार शंकरराव गडाख पाटील राज्यात जलसंधारण कॅबिनेट मंत्री पदावर काम करत असताना राज्यात त्यांनी केलेल्या तालुक्यातील पाणीदार कामामुळे राज्यात मोठा शेतकऱ्यांना फायदा होत असून त्यांचे राज्यभर कामाचे कौतुक होत आहे. त्यांनी तालुक्यात भूजलपातळी पातळी वाढवण्यासाठी केलेले यशस्वी योजनेमुळे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत कधीच पाण्याची कमतरता जाणवत नासून बागायती क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. भविष्यात त्यांच्या या जलसंधारण खात्याच्या माध्यमातून लवकरच राज्य दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवेल असा विश्वास जंगले यांनी व्यक्त करुन लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.  

नेवासे तालुक्यातील पाणीदार आमदार शंकरराव गडाख हे राज्याचे जलसंधारण कॅबिनेट मंत्री पदावर हेवा वाटावा असं काम सुरू असल्याने नक्कीच तालुका तसेच जिल्ह्याचे नांव त्यांच्या रुपाने राज्यात झळकत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा परिषदेचे अर्थ, पशुसंवर्धन सभापती सुनीलभाऊ गडाख यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकास कामांचा धडाका लावला असून ते  कुठल्याही अडचणी निर्माण झाल्या तर सामन्यांन मागे खंबीरपणे उभे असल्याचे सुनीलभाऊ गडाख मित्र मंडळाचे किशोर जंगले यांनी व्यक्त करुन नामदार शंकरराव गडाख यांना शुभेच्छा दिल्या. नामदार शंकरराव गडाख पाटील हे नेहमीच राजकीय विरहित काम करत आसल्याने मतदार संघात तसेच राज्यात त्यांच्या जलसंधारण विभागाचे मोठे काम आसल्याचे  महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख- बाळासाहेब नवगिरे यांनी पाणीदार नामदार शंकरराव गडाख पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक उपसरपंच रामभाऊ जंगले यांनी आभार- विशाल जंगले यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत