२८ हजार रुपयांची लाच घेताना धोत्रेचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

२८ हजार रुपयांची लाच घेताना धोत्रेचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

 कोपरगाव/वेबटीम कोविडच्या भयावह संकटाचा सामना करणाऱ्या प्रशासनातीलच कर्मचारीच लाच घेत असल्याचा प्रकार शनिवारी (ता.२९) उघडकीस आला आहे. कोपरगा...

 कोपरगाव/वेबटीम

कोविडच्या भयावह संकटाचा सामना करणाऱ्या प्रशासनातीलच कर्मचारीच लाच घेत असल्याचा प्रकार शनिवारी (ता.२९) उघडकीस आला आहे. कोपरगाव तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या धोत्रे सजाच्या कामगार तलाठ्यास वाळूच्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.


कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय ३३) याने येथीलच तक्रारदाराकडे वाळूच्या वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी ६८ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर शनिवारी पंचा समक्ष २८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 


सदर कारवाई लाचलुचपत नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, पोलीस अधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, संदीप साळुंखे, पोलीस नाईक प्रवीण महाजन, गरुड, गवळी, कराड, चापोशी, जाधव यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, सहा महिन्यात तीन तलाठ्यांसह एक तुरुंग अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत