अखेर आंबी येथे कोरोना लसीकरण सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अखेर आंबी येथे कोरोना लसीकरण सुरू

  आंबी (वेबटीम) : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या आंबी येथे अखेर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झ...

 आंबी (वेबटीम) :

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत येत असलेल्या आंबी येथे अखेर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे यांनी राहुरीचे इंसिडेंट कमांडर तथा तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे मागणी केली होती.

      आंबी येथील नागरिकांना देवळाली प्रवरा येथे लस घेण्यासाठी जावे लागत असल्याने वेळ, पैसा यांचा अपव्यय होत होता. शासनाने घराबाहेर पडण्यावर निर्बंध घातल्याने लस घेण्यासाठी नागरिक धजावत नव्हते. परिणामी लसीकरणाचा टक्का वाढत नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाने लवकरात लवकर कोरोना लसीकरण सुरू करावे अशी मागणी परिसरातून होत होती. आंबी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात लसीकरण पार पडले. पहिल्या टप्प्यात आंबीसाठी साठ डोस पुरविण्यात आले. हे डोस गावातील फ्रंटलाईन वर्कर्स आणि पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले. यावेळी सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, तलाठी रूपेश कारभारी, ग्रामसेवक अभिजित पिंपळे, डॉ. वाळुंज, परिचारिका सिस्टर अमृत व आशासेविका उपस्थित होते.

"आंबी येथे कोरोना लसीकरण सुरू झाल्याने गरीब, आदिवासी, कष्टकरी, दिव्यांग, महिला, वृद्ध बांधवांना लस घेणे सोयीचे झाले. त्यामुळे वेळेची व पैशाची बचत होईल. ग्रामस्थांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे. मागणी मान्य केल्याबद्दल राहुरीचे तहसिलदार फसियोद्दिन शेख यांचे मनःपूर्वक आभार.

- जालिंदर रोडे (तालुकाध्यक्ष - धनगर समाज संघर्ष समिती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत