खरीप हंगामात कृषी सेवा केंद्राची वेळ वाढून मिळावी, छावाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खरीप हंगामात कृषी सेवा केंद्राची वेळ वाढून मिळावी, छावाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  श्रीरामपूर (वेबटीम):- खरीप हंगामात कृषी सेवा केंद्राची वेळ वाढून मिळावी तसेच कांदा धान्य मार्केट सुरू करावा अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने...

 श्रीरामपूर (वेबटीम):-

खरीप हंगामात कृषी सेवा केंद्राची वेळ वाढून मिळावी तसेच कांदा धान्य मार्केट सुरू करावा अशी मागणी छावा संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन वाढत चालल्याने तसेच खरीप हंगामा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना बियाणे खते खरेदी साठी शहरात आणि गावातील दुकानात जावे लागते. त्या दुकानाची वेळ 7 ते 11 असल्याने त्या वेळेत जाऊन खरेदी पूर्ण होत नाही त्यासाठीकृषी सेवा केंद्राची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत वाढून द्यावी. त्याच प्रमाणे खरिपात बियाणे खते खरेदी साठी शेतकऱ्यांना पैसेही पाहिजेत आणि शेतमाल कांदा धान्य विक्रीतून पैसे येण्याचा मार्ग मार्केट बंद असल्याने बंद झालाय म्हणून आपणास या निवेदनाद्वारे विनंती अहेकी कांदा धान्य मार्केट  सुरू करावी तसेच खरीप हंगामातील  पेरणी साठी शेतकऱ्यांची होणारी अडचण दूर करण्यास मदत करावी अशी मागणी  या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांची सही आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत