विखेंना रोखण्यासाठी थोरातांना 'शिर्डी संस्थान' हवेचं ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विखेंना रोखण्यासाठी थोरातांना 'शिर्डी संस्थान' हवेचं !

शिर्डी/वेबटीम:- जगातील श्रीमंत देवस्थानपैकी एक समजल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साई संस्थान विश्वस्त निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. आज मुंबई य...

शिर्डी/वेबटीम:-


जगातील श्रीमंत देवस्थानपैकी एक समजल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साई संस्थान विश्वस्त निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. आज मुंबई येथे यावर मोठी  खलबते झाल्याचे समजते. यात, काँग्रेस- राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदावर दावा केला जात असला तरी शिर्डी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच येथे सहमतीने निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळे, आ.निलेश लंके, आ. रोहित पवार, सुरेश वाबळे आदी नावे चर्चेत आहेत. मात्र, राज्यपाल नियुक्त 12 लोकांच्या यादीतील काहींना येथे संधी देण्यासाठीही विचार विनिमय सुरू असल्याने जिल्ह्याचे याकडे लक्ष लागून आहे.

  शिर्डी संस्थांनच्या विश्वस्त निवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने साई संस्थानकडून सर्व माहिती मागवली आहे, ती माहिती मंत्रालयात देण्यात आली आहे, याबाबत मंत्रालयात प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक देखील आयोजित केली होती, त्यामुळे दोन आठवड्यात संस्थानवर नवे कारभारी नियुक्त होतील, अशी अपेक्षा आहे. आता अध्यक्ष पदाच्या बाबतीत साई संस्थान हे काँग्रेसकडे आहे. मात्र यावेळी जिल्ह्यात 6 आमदार असलेल्या राष्ट्रवादीकडून देखील अध्यक्ष पदावर दावा केला जात आहे.  त्यामुळे काहीसा संघर्ष वाढू लागला आहे. मात्र काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या राधाकृष्ण विखे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी येथे दोन पाऊले कधीही मागे येऊ शकते, त्यात शिर्डी मतदार संघ हा आघाडीत कॉंग्रेसकडेचं आहे. विखेना रोखू शकणारे नेतृत्व उभे करायचे असेल तर साई संस्थान ही एक संधी आहे आणि ती महसूल मंत्री थोरात आणि पवार देखील सोडणार नाहीत.     
   

आम्ही पक्षाचे एकनिष्ठ लोक आहोत, पार्टी देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडत असतो, आमची पक्षावर श्रद्धा आहे, आणि कोणत्याही गोष्टीची घाई नसल्यामुळे सबुरी देखील आहे. श्रद्धा आणि सबुरी बस्स..!   सत्यजित तांबे
 
  वास्तविकता, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विखे भाजपात गेल्याने शिर्डीत विखेंच्या विरोधात आघाडीला उमेदवार शोधावा लागला होता, मात्र, आता ती वेळ येऊ नये, यासाठी आघाडी सावध झालेली आहे. त्यात, शिर्डी मतदार संघात थोरातांच्या संगमनेर तालुक्यातील आश्वि आणि जोर्वे हे दोन गट समाविष्ट आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची हक्काची काही मते येथे आहेतच. यात साई संस्थान हाती आले तर शिर्डी आणि परिसरातील गावेही वर्चस्वाखाली येऊ शकतात, त्यातून आघाडीची अर्थात काँग्रेसची  ताकद वाढू शकते व परिणामी विधानसभेला येथे चमत्कार घडण्याची अपेक्षाही ठेवली जाऊ शकते. आता काँग्रेसकडून येथे युवानेते सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे. नगर शहरात त्यांनी मोठा नेटवर्क उभा केला आहे मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांना थांबवले होते, तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतही ऐनवेळी त्यांना थांबावे लागले होते. गेल्यावेळीही शिर्डी विधानसभेसाठी विखेंच्या विरोधात उभे राहण्यासाठी त्यांनी मुलाखत दिली होती, मात्र तिथंही त्यांना थांबावे लागले. आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र तिथेही जुळून येण्याचा योग,  दिसत नसल्याने आता साई संस्थानवर त्यांना मोठी संधी देण्यासाठीही हालचाली सुरू आहेत. तांबे याना संधी मिळाली तर शिर्डीचे राजकीय गणित देखील बदलणार आहे. याशिवाय 12 लोकांच्या यादीतील काँग्रेसची अन्य 2  नावे देखील चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून आ. आशुतोष काळे, रोहित पवार, निलेश लंके, सुरेशराव वाबळे आदी नावे चर्चेत आहेत, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत