नेवासा : प्रतिनिधी श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह दोन मोटार वाहन निरीक्षकांचा सेवानिवृत्...
नेवासा : प्रतिनिधी
श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह दोन मोटार वाहन निरीक्षकांचा सेवानिवृत्तीबद्दल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिगचे सर्व नियम पाळत सत्कार करण्यात येऊन त्यांना निरोप देण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्पाक खान, मोटार वाहन निरीक्षक अशोक वाघ व मोटार वाहन निरीक्षक शाहिद सय्यद हे तीन अधिकारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. अश्पाक खान यांनी श्रीरामपूर येथे दोन वर्ष सेवा दिली. १९८५ साली ते या खात्यात रुजू झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी मुंबई, रत्नागिरी, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी चिंचवड (पुणे), जालना व शेवटी श्रीरामपूर येथे यशस्वीरीत्या आपली कारकिर्द सांभाळली.
मोटार वाहन निरीक्षक अशोक वाघ हेदेखील १९८५ साली या खात्यात रुजू झाले असून त्यांनी बीड, जळगाव, नांदेड, धुळे, नंदुरबार व शेवटी श्रीरामपूर येथे दोन वर्ष सेवा दिली.१९९४ साली परिवहन खात्यात रुजू झालेले शाहिद सय्यद यांनी नाशिक, अहमदनगर, नांदेड, नागपूर व शेवटी श्रीरामपूर येथे सेवा दिली.
श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्वच्छ प्रतिमा जनमानसात रुजविण्यासाठी या तिघांनीही विशेष परिश्रम घेतले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी कायम सुसंवाद ठेवत जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. विशेष म्हणजे कोविडपूर्व काळात महसूलचे ९५ कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात त्यांनी यश मिळविले होते. वाहन चालक मालक प्रतिनिधी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी नामवंत व दिग्गज लेखक तसेच राजकारण्यांचे लेख समाविष्ट असलेले बहुचर्चित `ऐैवज´ हे पुस्तक भेट देऊन त्यांचा भावनिक सत्कार केला.
याप्रसंगी साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे, मोटार वाहन निरीक्षक जयश्री बागुल, संदीप निमसे, विलास वडीतके, जमिर तडवी, गणेश पिंगळे, विनोद घनवट, अर्चना फटांगरे - घनवट, लिपिक विलास नागरे, प्रकाश शिलावट, निशिकांत दोंदे, सारंग पाटील, वैभव गावडे, अंकुश भेंडे, रावसाहेब शिंदे, नरेंद्र इंजापुरी, सुनिल निमसे, राजेंद्र गरड, भरत घुणावंत, विशाल पाटील, रुपाली ठाकरे, श्रीकांत शेरे, अभिजीत कुऱ्हाडे यांसह मयूर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक प्रताप शिंदे, वाहन चालक - मालक प्रतिनिधी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप गाडेकर आदी उपस्थित होते.
-----------------------------
परिवहन कार्यालयातील कामासाठी सर्वसामान्यांनी संगणकीकरणावर जोर देऊन ई सेवेचा फायदा घ्यावा. राज्य सरकारने रिक्षा चालकांसाठी जाहीर केलेले १५०० रुपयांच्या मानधनाचा ऑनलाइन अर्ज भरून सर्वांनी लाभ घ्यावा. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातच एक ऑनलाईन मदत केंद्र उघडण्यात आले असून त्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांनी आपले आधार कार्ड पडताळणी करून अर्ज भरावे.! अश्पाक खान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर
अश्फाक खान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यापुढील काळातही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लोकाभिमुख कामे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी जनतेनेदेखील आपल्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे..! गणेश डगळे, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
--------------------------


कोणत्याही टिप्पण्या नाहीत