कोपरगाव/वेबटीम:- आमदार व नगराध्यक्ष प्रसिद्धीला हपापलेले आहेत असा आरोप करणार्या उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचा यात काहीच दोष नाहीये. सं...
कोपरगाव/वेबटीम:-
आमदार व नगराध्यक्ष प्रसिद्धीला हपापलेले आहेत असा आरोप करणार्या उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांचा यात काहीच दोष नाहीये. संजीवनीकडून तयार होऊन आलेल्या बातमीवर त्यांचे फक्त नाव असते, असा खुलासा खुद्द नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीच केला आहे.
कोविडच्या संकटातही कोपरगावमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. यापूर्वी पालिकेची निवडणूक होण्यापूर्वी कुठलाही कार्यादेश नसताना बिपीन कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी घाईघाईने वाचनालय इमारत, नगरपरिषद कार्यालय व जिजामाता उद्यान या तीनही कामांचे भूमिपूजन व कोनशीला लावण्याचे काम केले. पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नसल्याने 16 सप्टेंबर, 2016 रोजी कोनशीला लावून घेतल्या. त्या कोनशीला बनविण्याचे काम करणार्यास अजूनही बिल दिले गेलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये कार्यादेश नसतानाही बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कामांचे भूमिपूजन करण्याचा आग्रह धरला होता हे आठवत नाही का? असा सवाल वहाडणे यांनी केला आहे.
तर सध्या होत असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन केले तर आमदार व नगराध्यक्षांना प्रसिद्धीची हौस आहे असे हास्यास्पद आरोप करायचे. आजपर्यंत एकदाही माझ्या फोटोचा फलक लावू दिलेला नाही आणि लावलेला देखील नाही. एकदा तर लावलेला फलक काढायला लावला. आजपर्यंत बहुसंख्य वेळा ध्वजारोहण करण्याची, भूमिपूजन, उद्घाटन करण्याची दुसर्यांनाच संधी दिली. कोल्हे तर कोरोना रुग्णांना पुरणपोळ्या वाटतानाचेही फोटो काढून किळसवाणी प्रसिद्धी मिळवितात. पुरणपोळ्याही संजीवनीच्याच खर्चाने मग तुम्ही सुरू केलेल्या कोविड सेंटरबद्दल अभिनंदन?
खरेतर कोल्हे यांनी नगरसेवकांचा वापर करून कसे डावपेच पालिकेत केले हे जनतेला साडेचार वर्षांत चांगलेच अनुभवयास आले आहे. परंतु, मी नगरसेवकांना दोष देणार नाही. कारण येणार्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी संजीवनीचा आदेश पाळावाच लागतो. केवळ काही नगरसेवकच नव्हे तर अजून 4-5 भाटही याच कामासाठी पोसलेले आहेत. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या फलकावरही पती-पत्नीचे फोटो का असतात? फलकाचा खर्चही शेतकरी सभासदांच्या संजीवनीतूनच भागविला जातो ना? असे नानाविध सवाल करुन नगराध्यक्ष वहाडणे यांनी कोल्हेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत