राहुरी रोटरी क्लब ब्लड बँकला शिक्षक-शिक्षकेतर मंडळाची ५१ हजारांची मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी रोटरी क्लब ब्लड बँकला शिक्षक-शिक्षकेतर मंडळाची ५१ हजारांची मदत

  राहुरी/वेबटीम:-  कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता सामाजिक कार्यासाठी दान देण्याची संकल्पना राबवत अहमदनगर जिल्हा...

 राहुरी/वेबटीम:- 

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता सामाजिक कार्यासाठी दान देण्याची संकल्पना राबवत अहमदनगर जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिवर्तन मंडळाच्यावतीने राहुरी येथील रोटरी क्लब ब्लड बँक या संस्थेत 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. ही मदत नुकतीच रोटरी क्लबचे सचिव डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे.

  याबाबत माहिती अशी की कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिवर्तन मंडळाच्या व शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे मित्र मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या वाढदिवसाचा खर्च सामाजिक कार्यासाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून अगदी काही दिवसातच दीड ते दोन लाख रुपयांचा निधी या योजनेअंतर्गत संकलित झाला आहे यातून सामाजिक कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध संस्थांना तसेच कोव्हीड सेंटरला आर्थिक मदत करण्यात आलेली आहे राहुरी येथील रोटरी क्लब ब्लड बँक या संस्थेस रुग्णांच्या सेवेसाठी केल्या जाणाऱ्या नूतनीकरणासाठी 51 हजार रुपयांचा मदत निधी नुकताच रोटरी क्लब ब्लड बँकेचे सचिव डॉक्टर जयंत कुलकर्णी यांच्याकडे परिवर्तन शिक्षक मंडळाचे नेते आप्पासाहेब शिंदे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक दत्तात्रेय पानसंबळ शिक्षक नेते सुनील दानवे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला यावेळी परिवर्तन मंडळाचे सदस्य संभाजी गाडे बाळासाहेब जाधव ईश्वर शेलार प्रकाश धनवटे संजय कंगले प्रशांत होन पत्रकार गणेश विघे बबनराव लांडगे प्रसाद शिंदे भाऊसाहेब जिवडे बद्रीनाथ शिंदे आदिंसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नेहमीच केलेला आहे आपल्या उत्पन्नातला खारीचा वाटा हा समाजाच्या हितासाठी दिला पाहिजे कोरोना महामारी मध्ये ही काळाची गरज आहे हे ओळखून जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च संकलित करून तो विविध सामाजिक संस्थांना देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जेणेकरून समाजातील सामान्य घटकाला याचा फायदा पोहोचेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी व माझे सर्व सहकारी काम करत आहोत हा निधी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांना तसेच कोरोना विलगीकरण कक्षांना देण्यात आलेला आहे यापुढेही माझे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अशाप्रकारे फंड उभा करून आणखी काही संस्थांना त्यातून निधी देण्याचा प्रयत्न करतील व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतील असा आम्हाला विश्वास आहे.

यावेळी आभार व्यक्त करताना डॉक्टर जयंत कुलकर्णी यांनी सांगितले की समाज अडचणीत असेल तेव्हा शिक्षकांनी नेहमीच आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला आहे रोटरी क्लब सारख्या संस्थेला मदत करून त्यांनी आपल्यातील मोठेपण दाखवून दिली आहे असेच विविध उपक्रम हाती घेऊन आपला आदर्श समाजापुढे ठेवणारे हे शिक्षक इतरांनाही प्रेरणादायी ठरतील असा माझा विश्वास आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत