कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तालुक्या...
कोपरगाव(वेबटीम):-
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील कोरोना योध्यांचा ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कोकमठाण तसेच तालुक्यात कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका व स्वच्छता कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, अशा सर्वांचा शिवसेना वर्धापनदिनाच्या निमित्त ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.उषाताई दुशिंग व बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.देसले, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री.सरोदे, डॉ.फुलसौंंदर, डॉ.ढाकणे मॅडम, डॉ.खोत, डॉ.पारखे, पत्रकार नानासाहेब जवरे, जनार्दन जगताप, ग्रामसेवक श्री.गायकवाड, आपत्ती समनव्यक सुशांत घोडके यांच्यासह मनीषा वाळुंज, सुरेखा जामदार, मनीषा पवार, राणी मते यांच्यासह २२ महिलांना पैठणी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर प्रसंगी शंकरराव काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहम, उपसरपंच दीपक रोहम, संजय दंडवते, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब राऊत, सीताराम लोहकने, राजेंद्र वहाडणे, शिवाजी जाधव, उत्तमराव जाधव, बाळासाहेब पवार, मच्छिन्द्र देशमुख, माधवराव टेके, सुभाष पोळ, सुनील दुशिंग, आबा रक्ताटे, जावेद सय्यद, अल्लू सय्यद यांचेसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत