देवळाली प्रवरात विद्यार्थीविना शाळेत शिक्षकांची गैरहजरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात विद्यार्थीविना शाळेत शिक्षकांची गैरहजरी

देवळाली प्रवरा प्रतिनिधी   देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद शाळेत कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शाळा बंद असली तरी शिक्षकांसाठी शाळा चालू आहे.म...

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

 देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद शाळेत कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शाळा बंद असली तरी शिक्षकांसाठी शाळा चालू आहे.माञ विद्यार्थी शाळेत नसल्याने शिक्षकांनीही शाळेकडे पाठ फिरविली आहे.शाळेत शिक्षकांनी उपस्थित  राहण्याचा आदेश शिक्षणधिकारी यांनी काढला असुन या आदेशाला शिक्षकांनी केराची टोपली दाखविली आहे.

           राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद मराठी शाळा असुन गेल्या दिड वर्षात शाळेची घंटा वाजली नाही. मे 2021 मध्ये विद्यार्थ्यांन विना शाळा सुरु करण्याचे लेखी आदेश शिक्षणधिकारी यांनी काढले आहे.विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.परंतू शिक्षकांसाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. सकाळी 10 ते 5 वाजे पर्यंत शिक्षकांनी शाळेत येवून थांबवायचे आहे. असे शिक्षणधिकारी यांनी आदेश काढुन ही शिक्षक माञ शाळेकडे फिरकत नाही. देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद शाळेत शिक्षक सकाळी 11 वाजता येवून दुपारी 12 वाजता घरी निघुन जाताना दिसत आहे.शिक्षणधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.

               देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद शाळेत शिक्षक दिवसभर फिरकत नसल्याने गेल्या महिण्यात भर दिवसा शाळेचे दरवाजे तोडून शाळेतील फँन व इतर साहित्य चोरी गेले होते.पोलीसांकडे दिलेल्या फिर्यादीत राञी चोरी झाल्याचे दाखविण्यात आले होते. देवळाली प्रवरा पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवून पाच ते सहा दिवसात चोरी छडा लावून पिण्या उर्फ विष्णू बर्डे वय 20 , तुक्या उर्फ तुकाराम अनिल पवार वय 22, कैलास जगन बर्डे वय 32 (सर्व रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी भिलवाडा) या तिघांना चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या तिघांनी भर दिवसा शाळेचे दरवाजे तोडून चोरी केल्याचे पोलीस तपासात सांगितले आहे.शिक्षक दिवसभर शाळेत थांबले असते तर शाळेचे दरवाजे तोडून चोरी करण्याची या तिघांची हिम्मत झाली नसती. परंतू शिक्षकच शाळेत थांबत नसल्यामुळे शाळेच्या मैदानावर बसुन खुलेआम तळीराम दारु पित बसताना दिसतात शाळेचे मैदान दारु अड्डा बनविले आहे.मैदानावर कुठे हि नजर मारली तर दारुच्या बाटल्या नजरेस पडत आहे.शाळेचे मैदान आहे की दारु अड्ड्याचे मैदान आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.

            सध्या शाळेत शिक्षक  सकाळी 11 वाजता शाळेत येवून 12 वाजता घरी निघुन जात आहे. शिक्षकांना आवघी एकच तास शाळा आहे का? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहे. सोमवारी दुपारी 4;15 वाजता स्थानिक पञकाराने गट शिक्षणधिकारी सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधुन शाळेत एक हि शिक्षक उपस्थित नाही का? विचारणा केली असता. शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांना चौकशी करण्याचे सांगतो.माञ सायंकाळी 5 वा. शिक्षण विस्तार अधिकारी गारुडकर यांनी शाळेत येवून भेट रजिस्टरला शिक्षकांच्या उपस्थिती बाबत काय शेरा लिहला हे माञ समजू शकले नाही.

               शाळेचे मैदानावर कचऱ्याचे ढिग साचले आहे.गवत माजले आहे. एक हि शिक्षक कचरा अथवा माजलेले गवत काढण्यासाठी धजवत नाही. शाळा सुरु झाल्या नंतर विद्यार्थ्यांकडूनच मैदानावरील कचरा व माजलेले गवत साफ करुन घेतले जाईल विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येतात की मैदानावरील कचरा उचलण्यासाठी शाळेत येतात यावर पालकांनी तिखट प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहे. आज माञ विद्यार्थी विना शाळेत शिक्षकच गैरहजर आहेत.

देवळाली प्रवरा मराठी शाळेत विना विद्यार्थी शाळेत शिक्षक शाळेचे गेट बंद करुन घरी थांबतात माञ गेटचे राखन एकटा कुञा करताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत